महिलांना समाजात मानाच स्थान मिळावं त्याचप्रमाणे व्यवसायामध्येसुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली या योजनचे नाव महिला उद्योगिनी योजना असं आहे. सदर योजनेअंतर्गत लघुव्यवसायिक क्षेत्रातील व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी जास्तीत जास्त तीन लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
उद्योगिनी योजना काय आहे ? (Udyogini Scheme)
स्वतःच्या पायावर उभारून स्वावलंबी व्हावं म्हणून महिलांची सातत्याने धडपड असते. एखादा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवायचं म्हटलं तर, स्वतःजवळ भांडवल नसतं. त्यामुळे महिला उद्योग उभारू शकत नाहीत. महिलांजवळ कौशल असूनसुद्धा त्यांना उद्योग उभारता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन शासनाकडून महिलांना बँकेमार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची सुविधा उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून करण्यात येते.
या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत व्याज परतावा निरंक करण्यात आला आहे. यात कर्ज रकमेच्या तीन टक्के व्याज केंद्रशासनाकडून भरण्यात येणार व चार टक्के व्याज राज्यशासनाकडून भरण्यात येणार. यामुळे तीन लाखापर्यंत बिनव्याजी महिलांना कर्ज उपलब्ध होणार आहे.
कोणत्या व्यवसायासाठी मिळणार कर्ज ?
महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी महिलांना कर्ज दिलं जातं. आता बहुतांश महिलांना प्रश्न पडलेला असेल ? कोणत्या व्यवसायासाठी आम्हाला कर्ज मिळणार. तर त्यासाठी खालीलप्रमाणे काही व्यवसाय देण्यात आलेले आहे, ज्यासाठी कर्ज देण्यात येईल.
- बांगड्या बनविण्याचा व्यवसाय
- ब्युटी पार्लर
- बेडशीट आणि टॉवेल बनविण्याचा व्यवसाय
- बुक बाईंडिंग, नोटबुक व्यवसाय
- कॉफी व चहा पावडर बनविण्याचा व्यवसाय
- मसाले, कापूस धागा उत्पादन
- रोपवाटिका, कापड, दुग्धव्यवसाय
- पोल्ट्री संबंधीत व्यवसाय
- डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय
- ड्राय क्लीनिंगचा व्यवसाय
- सुक्या मासळीचा व्यापार
- खाण्याचा व्यवसाय
- खाद्यतेलाच्या दुकानाचा व्यवसाय
बिनव्याजी कर्ज कोणाला मिळणार ?
उद्योगिनी योजनेअंतर्गत ज्या महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग असतील, त्यांना बिनव्याजी कर्ज दिलं जाईल. याउलट इतर महिलांना अल्प प्रमाणात व्याजदर आकारण्यात येईल.
उद्योगिनी योजना अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला 18 ते 45 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- विधवा, निराधार असलेल्या महिलांना उद्योगिनी योजनेअंतर्गत वयोमर्यादेची कोणतेही अट ठेवण्यात आलेली नाही.
- कर्जाचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणत्याही जामनदाराची आवश्यकता भासणार नाही.
- कर्ज परतफेडीचा कालावधी 7 वर्षाचा असेल.
- अर्जदार महिलाच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे.
उद्योगिनी योजना अर्जप्रक्रिया (Application Process)
इच्छुक व पात्र महिलांना उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील संबंधित सरकारी किंवा खाजगी बँकांना भेट द्यावी लागेल. त्या बँकेतून महिलांना कर्ज दिलं जातं, ज्यामध्ये पंजाब बँक, सिंध बँक, सारस्वत बँक इत्यादी बँकेचा समावेश आहे, ज्यामधून महिलांना सहजासहजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
⭕ उद्योगिनी अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
महिला उद्योगिनी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे का ?
हो, महिला उद्योगिनी योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे.
उद्योगिनी योजनासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
उद्योगिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. यासाठी इच्छुक महिलांना संबंधित बँकेमध्ये जाऊन चौकशी करून लाभ घ्यावा लागेल.
महिला उद्योगिनी योजनेसाठी किती व्यवसायिक कर्ज देण्यात येत ?
सदर योजनेअंतर्गत महिलांना जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज देण्यात येतं.
फक्त महिलांसाठी विविध योजना 👇
महिलांसाठी स्वर्णिमा योजना | येथे क्लिक करा |
महिलांना मोफत सोनोग्राफी | येथे क्लिक करा |
महिला उद्योजक धोरण योजना | येथे क्लिक करा |
महिला सन्मान योजना | येथे क्लिक करा |