राज्यातील महिलांसाठी राज्य शासनामार्फत नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून, आता जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा (Sonography Facility) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
🔴 हे सुध्दा वाचा : महिलांसाठी स्वर्णिमा योजना; 2 लाखापर्यंत कर्ज मिळणार
महिलांच्या गरोदरपणात बाळाची योग्य वाढ होणं आई व बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. त्यासाठी वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक असते. खेड्यातील तसेच शहरातील महिला बऱ्याच वेळी पैशाअभावी सोनोग्राफी करून घेत नाहीत; परिणामी बाळाची गर्भात योग्य वाढ झाली आहे का नाही किंवा त्यात व्यंग आहे का ? याचे वेळीच निदान होत नाही.
Janani Suraksha Yojana काय आहे ?
वरील सर्व बाबींचा विचार करून जननी सुरक्षा योजना अंतर्गत महिलांना आता मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जननी सुरक्षा योजना काय आहे ?
गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन आई व बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत 12 एप्रिल 2005 पासून जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना बाळाच्या गर्भापासून बाळाच्या जन्मापर्यंत विविध स्तरावर आर्थिक मदत (Financial) केली जाते. यामध्ये आता आणखी एक मोफत सोनोग्राफीची नवीन सुविधा जोडण्यात आली आहे.
मोफत सोनोग्राफी योजना सुरू
महानगरपालिका, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात गरोदर स्त्रियांची मोफत सोनोग्राफी केली जाते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात मातृत्व अभियानाअंतर्गत महिलांची तपासणी केल्यानंतर सलग्न खाजगी सेंटरमध्येसुद्धा एक वेळी मोफत सोनोग्राफी केली जाते.

गर्भवती महिलाव्यतिरिक्त इतर महिलां किंवा रुग्णांना सोनोग्राफीसाठी 100 रु. इतकी फीस आकारली जाईल. खाजगी दवाखान्यात सोनोग्राफीचा खर्च जवळपास 2,000 रु. इतका आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील महिलांना दवाखान्यातील खर्चापासून नक्कीच दिलासा मिळेल.
सोनोग्राफी का करावी लागते ?
गर्भवती महिलांच्या बाळाची वाढ योग्यरीत्या होत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीमध्ये बाळ व्यंग असेल, तर कळते किंवा जर बाळाची वाढ होत नसेल, तरीसुद्धा रिपोर्टवरून ते लक्षात येते, त्यानुसार बाळावर योग्य तो औषधोपचार केला जातो.
गरिबांना आर्थिक दिलासा
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वंचित गटातील व दारिद्र्य रेषेखालील महिलांना आता शासनाकडून मोफत सोनोग्राफीची सुविधा जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, महानगरपालिका स्तरावर शासकीय रुग्णालयामध्ये दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे प्रशंसा बहुतांश महिलाकडून होत आहे
🌾 शेतकरी योजना | येथे क्लिक करा |
🔔 सरकारी योजना | येथे क्लिक करा |
🔰 शासन निर्णय | येथे क्लिक करा |
⚖️ रेशन न्यूज | येथे क्लिक करा |