लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली असून लवकरच यासंदर्भातील GR (शासन निर्णय) निर्गमित करण्यात येईल. लेक लाडकी योजना काय आहे ? Lek Ladki Yojana साठी अर्ज कसा करावा ? कागदपत्रं कोणती लागतील ? इत्यादी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024
नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी एक योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्या योजनेच नाव म्हणजे (lek ladki yojana) लेक लाडकी योजना होय.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र मुलींना 75,000 रुपयापर्यंत शिक्षणासाठी आर्थिक (Economic) मदत केली जाईल. मुलींना सशक्त, प्रबळ व आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजना Overview
योजना संपूर्ण नाव | लेक लाडकी योजना 2023 |
सुरू करणार राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी वर्ग | गरीब कुटुंबातील मुली |
मदत स्वरूप | जन्मापासून शिक्षण व मुलीच्या १८ वर्ष वयापर्यंत आर्थिक मदत |
एकूण मदत रक्कम | 75,000 रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | लवकरच येईल |
लेक लाडकी योजना पात्रता
- लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीच्या कुटुंबातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावा.
- फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाकडील 75 हजार रुपये मिळवायचे असल्यास, सर्व शैक्षणिक कागदपत्रं असणे अनिवार्य आहे.
आर्थिक सहायता रक्कम (Amount)
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना सशक्त व आत्मनिर्भर करण्यासाठी लहानपणापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शासनाकडून खालीलप्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते.
1) मुलीच्या जन्मानंतर पात्र कुटुंबाला 5,000 रु. इतकी मदत आर्थिक सहाय्य म्हणून करण्यात येईल.
2) मुलगी मोठी झाल्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये (वर्ग ०१) शिक्षणासाठी जायला लागल्यानंतर शासनाकडून 5,000 रु. आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
3) यानंतर मुलगी इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असल्यास शासनाकडून 6,000 रु. देण्यात येतील.
4) जर मुलगी इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असेल, तर त्यासाठी शासनाकडून 8,000 रु. देण्यात येतील.
5) मुलीच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मुलीच्या शिक्षणासाठी 75,000 रु. देण्यात येतील.
लेक लाडकी योजना कागदपत्रे (Documents)
- मुलीचा आधारकार्ड
- मुलीचा जन्माचा पुरावा
- रहिवाशी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रं
- कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
- उत्पन्नाचा दाखला
लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट
शासनाकडून या योजनेसाठी अद्याप अर्ज कसा करावा ? या संदर्भातील सविस्तर माहिती दिली नसल्यामुळे, लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट किंवा पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रासाठी लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे, त्यामुळे ही योजना लवकरच सुरू करण्यात येईल; परंतु यासाठी काही कालावधी लागू शकतो. आम्हाला या योजनेसंदर्भातील माहिती किंवा नवीन अपडेट करतात आमच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटवरती आम्ही तुम्हाला कळवू.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे व कसा करायचा ?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची माहिती दिली; परंतु अद्याप या योजनेअंतर्गत Online Registration अथवा lek ladki yojana online form देण्यात आलेला नाही अथवा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती याची माहिती देण्यात येईल.
lek ladki yojana साठी Online किंवा Offline पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाल्यानंतर पात्र लाभार्थी मुलींना अर्ज Online Apply करावा लागेल. अर्ज सादर करताना वरील नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे महत्त्वाच आहे.
लेक लाडकी योजना फॉर्म Online
लेक लाडकी योजना ऑनलाईन स्वरूपात राबविली जाईल की ऑफलाइन स्वरूपात राबविण्यात येईल, या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाच्या संबंधित विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे लेक लाडकी योजना pdf फॉर्म किंवा Online फॉर्म भरण्याची सुविधा सद्यस्थितीत तरी उपलब्ध नाही, माहिती उपलब्ध झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती काळजीपूर्वक संपूर्ण माहिती अद्यायावत करण्यात येईल.
लेक लाडकी योजना काय आहे ?
राज्य शासनामार्फत नुकतीच सुरू करण्यात आलेली मुलीसाठींची विशेष योजना. ज्या योजनेच्या माध्यमातून मुलींना शासनाकडून शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं.
लेक लाडकी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
लेक लाडकी योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थी मुलींसाठी लागू आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत किती मदत केली जाते ?
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शासनाकडून जवळपास 1 लाख रु. आर्थिक मदत केली जाते.
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अथवा ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
Lek Ladki Yojana नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे अर्जासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, याबद्दलची लवकरच माहिती देण्यात येईल.
लेक लाडकी योजना फॉर्म pdf भेटेल का ?
नाही, कारण अद्याप या योजनेची संपूर्ण जाहिरात, शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आलेला नाही, लवकरच ही माहिती जाहीर करण्यात येईल.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ?
अद्याप सदर योजनासंदर्भात शासनाकडून अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे, लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा, यासंदर्भातील तपशील उपलब्ध नाही.
लेक लाडकी योजनासाठी कागदपत्रे कोणती लागतील ?
लेक लाडकी योजनासाठी मुलीचा आधार कार्ड, जन्माचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्र लागतील.
लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ?
लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील मुली अर्ज करू शकतात त्यासाठी त्यांच्याकडे केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजना फॉर्म कसा भरायचा ?
लेक लाडकी योजना अद्याप चालू झालेली नाही, त्यामुळे ही योजना सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरावा या संदर्भातील माहिती आपण पाहूयात.