(2024) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महाराष्ट्र : Bal sangopan Yojana

By Admin

Updated on:

अनाथ बालकांसाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आलेला असून त्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे. आता या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावानं ओळखल जाणार आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या जवळपास 60 हजाराहून जास्त बालकांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या पूर्वीच्या असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी सर्व समावेशक असा शासन निर्णय काढून बालसंगोपन योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Krantijyoti Savitribai Phule Balsangopan Yojana

बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2(14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार, अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली होती. सदर योजना संस्थाबाह्य असून या योजनेअंतर्गत झिरो ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनकरिता ठेवता येते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना राज्य शासनाकडून 27 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनेसाठी प्रस्ताव करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून लाभार्थी कुटुंबातील बालकांचे संगोपन करणारी व्यक्ती अर्ज करू शकतात.

योजना नावक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
सुरुवातमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीमहाराष्ट्रातील अनाथ बालक
आर्थिक सहाय्य2,250 रु. दरमहा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

बालसंगोपन योजनेचा लाभ खालील बालकांना देण्यात येईल

 • अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नसेल, ज्यांना दत्तक घेणे शक्य होत नाही.
 • एक पालक असलेले बालक, मृत्यू घटस्फोट, अविवाहित मातृत्व, परित्याग, विभक्तीकरण, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे विघटित झालेल्या एका पालक असलेल्या कुटुंबातील कुष्ठरोग व जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके.
 • कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले बालक
 • बहुविकलांग बालक
 • ज्यांचे दोन्ही पालक (आई-वडील) दिव्यांग (अपंग) असतील अशी बालके
 • तीव्र मतिमंद, एचआयव्हीबाधित बालक, पालक अपंग असतील अशी बालके
 • बालकामगार विभागाने प्रमाणित केलेले

आर्थिक मदत किती ?

बालसंगोपन योजना अंतर्गत आता नवीन सुधारित शासन निर्णयानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला 2250 रु. मुलांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बालसंगोपन योजना सदर लाभार्थ्यांसाठी बंद करण्यात येईल, याची नोंद संबंधित लाभार्थीना घ्यावी.

बालसंगोपन योजना आवश्यक कागदपत्रे

 • विद्यार्थ्यांचा शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र
 • आई-वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र
 • लाभार्थी व पालकांचा आधारकार्ड
 • सांभाळ करणाऱ्या पालकांचा फिटनेस
 • पालकांचा संगोपन हमीपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • बालकाचा जन्माचा दाखला
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • लाभार्थी बालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • रहिवासी दाखला

बालसंगोपन योजना फॉर्म PDF

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. बालसंगोपन अर्जाचा नमुना किंवा बालसंगोपन अर्जाचा फॉर्म पीडीएफमध्ये तुम्हाला खालील रखाण्यामध्ये देण्यात आलेला असून तो तुम्ही डाऊनलोड करून संबंधित विभागाकडे दाखल करू शकता.

बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार मुला किंवा मुलीचे वय 1 ते 18 दरम्यान असावे.
 • या योजनेचा लाभ अनाथ, बेघर मुलांनाच देण्यात येईल.
 • लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • योजनेसाठी सर्व आवश्यक कागदपत्र लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक.

बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

बालसंगोपन योजनेसाठी Online Form भरण्याची सुविधा संबंधित विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी कुटुंबातील संगोपन करणाऱ्या पालकांनी बालसंगोपन योजनेचा अर्ज (form) किंवा बालसंगोपन योजना अर्ज Pdf नमुना संबंधित जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ICDS) कार्यालयात जमा करावा. फॉर्म जमा केल्यानंतर संबंधित विभागाकडून अर्जाची पडताळणी केली जाईल, त्यानंतर लाभार्थी बालक पात्र असल्यास अंतिम मंजुरी देऊन बँकेत दरमहा परिपोषण अनुदान देण्यात येईल.

शासन निर्णय PDFयेथे क्लिक करा
बालसंगोपन अर्ज फॉर्मयेथे क्लिक करा
सुधारित शासन निर्णययेथे क्लिक करा
इतर शासकीय योजनायेथे क्लिक करा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना काय आहे ?

अनाथ मुलांना आर्थिक सहाय्य देणारी महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी सरकारी योजना आहे.

बाल संगोपन योजनेत किती रक्कम (लाभ) दिला जातो ?

नवीन सुधारित शासन निर्णयानुसार बालसंगोपन योजनेत लाभार्थ्यांना दरमहा 2,250 रुपये इतका लाभ दिला जातो.

बाली संगोपन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने जिल्ह्याच्या महिला बाल विकास अधिकारी कार्यालयस संपर्क साधावा लागेल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment