Women Loan Scheme : महिला व बालकल्याण विकास विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, राज्य महिला आयोग इत्यादीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध अशा योजना राबवल्या जातात. यामागील शासनाचा एकच उद्देश असतो, महिलांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
स्वर्णिमा योजना काय आहे ?
ही योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक नवीन योजना असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
♦️ हे पण वाचा : महिला उद्योजक धोरण योजना; 50 लाखापर्यंत व्यवसाय लोन
या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारणीसाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्सस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
योजनेचं नाव | नवीन स्वर्णिमा योजना |
कोणाकडून सुरू | भारत सरकार |
विभाग | सामाजिक न्याय सक्षमीकरण विभाग |
उद्देश | महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे |
लाभ स्वरूप | 2 लाख रु. |
अधिकृत वेबसाईट | nbcfdc.gov.in |
स्वर्णिमा योजनेसाठी पात्रता (Eligibility)
- योजनेअंतर्गत उद्योगासाठी फक्त महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
- अर्जदार महिला भारताची रहिवाशी असावी.
- अर्जदार ही महिला असणे आवश्यक आहे.
- अर्जदारचं वय 18 ते 55 वर्ष या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या अर्जदारांचा वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावा.
- अर्जदार उद्योजक असायला हवे, उद्योगातील विविध गोष्टी, ज्ञान आवश्यक.
स्वर्णिमा योजनाचे फायदे (Benefits)
- या योजनेतून महिलांना उद्योगासाठी 2 लाख कर्ज उपलब्धता
- खूपच कमी व्याजदर
- फक्त 2% व्याजदर एकूण उपलब्ध कर्जावर
स्वर्णिमा अंतर्गत लोन मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- जातीचा दाखला
- बँक खाता
- रहिवाशी पुरावा
- मोबाईल क्रमांक
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करावा (Online Application)
सर्वप्रथम तुम्हाला स्वर्णिमा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी तुमच्या जवळील संबंधित एस.सी.ए (S.C.A) कार्यालयाला भेट देऊन अर्जाचा नमुना उपलब्ध करून घ्यावा लागेल. अर्जाचा नमुना मिळाल्यानंतर तो अर्ज सविस्तररित्या काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.
♦️ हे पण वाचा : लेक लाडकी योजना; मुलींना 98 हजार रु. मिळणार
अर्ज भरल्यानंतर योजनेसाठी विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची जोडणी अर्ज सोबत करून एस.सी.ए कार्यालयामध्ये अर्ज दाखल करायचा आहे. तुमचा अर्ज दाखल केला जाईल, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला शंभर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
एस.सी.ए यादीसाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिक योजनांच्या माहितीसाठी | येथे क्लिक करा |