वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना” सुरु : Vitthal Rukmini Varkari Vima Yojana

By Admin

Published on:

आपलं महाराष्ट्र राज्य वारकरी सांप्रदायिक राज्य म्हणून ओळखलं जातं. जणू महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाचा लाभलेला वसाच आहे. अशा वारकरी संप्रदायाच्या आरोग्याचा विचार करून आषाढी एकादशीनिमित्त राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण राज्यशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या वारकरी विमा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना

देह पांडुरंगा कवच पांडुरंगा या ब्रीद वाक्याचा आधार घेत शिंदे-फडणवीस सरकारमार्फत आषाढी एकादशीचे अवचित साधून वारकऱ्यांसाठी नवीन विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना वारीदरम्यान होणाऱ्या विविध हाणीपासून विमा संरक्षण मिळणार आहे. शासनाकडून या योजनेचे नाव विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना असं ठेवण्यात आलेल आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनामार्फत आता यापुढे विमा संरक्षण दिले जाणार असून शासनाच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने 30 दिवसांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. सदर योजना राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येत आहे. वारकरी विमा योजनेचा लाभ लाखो वारकऱ्यांना मिळणार असून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना खालील बाबींचा समावेश असेल

  • वारीदरम्यान एखाद्या वारकऱ्यांचा दुर्दैव मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयास 5 लाख रु. सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
  • दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास वारकऱ्यांना 1 लाख रुपये देण्यात येतील.
  • अंशतः अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील.
  • वारीच्या दरम्यान वारकरी आजारी पडल्यास औषध उपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च सदर योजनेअंतर्गत शासनाकडून देण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना झाल्याकारणाने त्यात बहुतांश वारकरी बांधव जखमी होतात किंवा दुर्दैवी त्यांचा मृत्यू होतो. अशा आपत्ती काळामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे.

• हे पण वाचा : यंदा आषाढी वारीसाठी मोफत प्रवासाची सुविधा

निष्कर्ष : वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वारकरी इन्शुरन्स विमा योजना खूपच लाभदायक ठरणार आहे; कारण दिंडीत सहभाग घेणारे बहुतांश वारकरी अतिशय गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना सहजासहजी खाजगी विमा योजनांचा लाभ मिळवता येत नाही. शासनाच्या या निर्णयामुळे नक्कीच लाखो वारकऱ्यांना विमा योजनेचा फायदा मिळणार आहे.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना कोणासाठी लागू असेल ?

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना राज्यातील तमाम वारकरी बांधवांना लागू असतील, जे दरवर्षी वारीमध्ये सहभाग घेतात.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना काय आहे ?

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक विमा कवच योजना आहे.

वारकरी विमा योजना केव्हापासून सुरू करण्यात आली ?

वारकरी विमा योजना महाराष्ट्र राज्यात दिनांक 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आली.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment