[2024] नमो शेतकरी योजना महाराष्ट्र लिस्ट, स्टेटस, लाभार्थी यादी, अर्ज, पहिला हफ्ता संपूर्ण माहिती : Namo Shetkari Yojana

By Admin

Updated on:

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य शासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचं नाव म्हणजे नमो शेतकरी योजना होय. या योजनेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा CM किसान योजना या नावानंसुद्धा ओळखलं जातं. सदरची योजना केंद्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करत असताना थोडीफार आर्थिक मदत शासनाकडून मिळावी हा होय.

नमो शेतकरी सन्मान योजना

केंद्रशासनाकडून 24 फेब्रुवारी 2019 रोजी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनासुध्दा अश्या एखाद्या योजनेचा लाभ मिळावा, याचा प्रयत्न सर्वोत्तपरी महाराष्ट्र शासन करत होतं आणि यासंदर्भातील मंजुरीसाठी निवेदनसुद्धा शासनाकडून देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेप्रमाणेच वार्षिक 6,000 रुपये देण्यात येतील. दर चार महिन्याला नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता असेल, म्हणजेच वार्षिक शेतकऱ्यांना तीन हप्ते देण्यात येतील. ज्याची एकंदरीत रक्कम 6,000 रु. असेल. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या दोन्ही योजनेमुळे वार्षिक 12 हजार रूपये मिळतील.

योजना संपूर्ण नावनमो शेतकरी योजना महाराष्ट्र 2024
विभागमहाराष्ट्र कृषी विभाग
योजना उद्दिष्टशेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रु. आर्थिक मदत
पात्रताराज्यातील अल्पभूधारक शेतकरी
एकूण लाभार्थी संख्या85 लाख 66 हजार
अर्जाची पद्धतआँनलाईन
लाभ स्वरूपरोख 6,000 रु. प्रतिवर्ष
अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in

नमो शेतकरी योजना स्टेटस

लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजना अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस पहावयाच असल्यास PM Kisan च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला “Know Your status” हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून संबंधित शेतकऱ्यांची अर्जाची स्थिती तुम्ही जाणून घेऊ शकता. नमो शेतकरी योजनेसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची वेबसाईट अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यासंदर्भातील काही अपडेट भेटल्यास आम्ही संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करू.

📣 माहिती वाचा : शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना (PMKMY)

नमो शेतकरी योजना 2024 यादी (लिस्ट)

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादी (beneficiary list pdf) पहावयाची असेल, तर त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. कारण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेत पात्र असलेल्या, सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यामुळे नमो शेतकरी योजना लिस्ट पाहण्यासाठी PM किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

नमो शेतकरी योजना पहिला हफ्ता

नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्तासाठी शासनाकडून 1720 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा शासन निर्णय (GR) दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील तब्बल 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना नमो शेतकरी योजना घोषित करण्यात आली, तेव्हापासून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे ? नमो शेतकरी योजना पहिला हफ्ता (1st Installment Date) कधी मिळणार ? तर याठिकाणी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या 26 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत शिर्डी इथून वितरित केला जाणार आहे.

नमो शेतकरी योजना दुसरा हफ्ता

शेतकरी मित्रांनो, 26 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार ? अशी चौकशी बहुतांश शेतकऱ्यांकडून केली जात आहे. Namo Shetkari Yojana 2nd Installment Date काय असेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूयात.

📣 माहिती वाचा : शेतकऱ्यांना फळ पिकांसाठी 3 लाखापर्यंत कर्ज

कृषी विभाग व संबंधित क्षेत्रातून नमो शेतकरी योजना 2024 चा दुसरा हप्ता हा 8 ते 10 फेब्रुवारी 2024 यादरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही तारीख अंदाजित असल्यामुळे यामध्ये कदाचित फरक पडू शकतो, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

अर्ज कसा करावा ? (online apply)

नमो शेतकरी योजना राज्यशासनाकडून घोषित करण्यात आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे अर्ज कसा करावा किंवा नमो शेतकरी योजनासाठी ऑनलाईन (Online Registration) अर्ज करावा लागेल का ?

तर मित्रांनो, अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ठेवण्यात आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अश्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सरसकट लाभ देण्यात येईल, यासंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही पात्रता वाचू शकता.

अधिकृत शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा
निधी वाटप शासन निर्णययेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

निष्कर्ष/Conclusion : शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना खूपच लाभदायक ठरणार आहे; कारण अल्पभूधारक शेतकरी खूपच हलाखीच्या परिस्थितीतून जीवन व्यतीत करता असतात. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता नक्की त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. रक्कम नक्कीच मोठी नाही; परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीविषयक बारीक-सारीक गरजा भागवण्यासाठी पुरेशी आहे.

FAQ

1. नमो शेतकरी योजना पहिला हप्ता कधी मिळणार ?

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाणारा आहे.

कृषी विभागाच्या शासकीय रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता 8 ते 10 फेब्रुवारी 2024 यादरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

3. नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

एखाद्या शेतकऱ्याने पीएम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत अर्ज केलेला असेल व त्यांना लाभ मिळत असेल, तर कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, जर त्यानी अद्याप PM किसान योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, तर अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा, त्यानंतर लाभार्थ्यांना पीएम कसा योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात येईल, यासाठी कोणतीही वेगळी अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली नाही.

4. नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार ?

नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच पहिला हप्ता शेतकऱ्यांना 26 ऑक्टोबर 2023 पासून वितरित केला जाणार आहे.

5. नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी कशी पहावी ?

नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment