नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR) आला ! 12 हजार रुपयांचा लाभ फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

By Admin

Published on:

शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना केंद्रशासनाप्रमाणेच दोन हजार रुपये दर चार महिन्याला देण्याची घोषणा तब्बल दोन महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. म्हणजेच शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या PM Kisan योजनेचे 6,000 रु. व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रु. असे एकंदरीत वार्षिक 12,000 रु. मानधन मिळणार आहे.

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana GR (शासन निर्णय)

यासंदर्भातील मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा राज्यशासनाकडून 30 मे 2023 रोजी घेण्यात आलेला होता. ज्यामध्ये नमो शेतकरी योजना व 1 रुपयात पिकविमा योजना या दोन्ही योजनेला मंजुरी देण्यात आली. शासनाकडून ही योजना घोषित करण्यात आली; परंतु यासंदर्भातील कोणताही शासन निर्णय (GR) शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे शेतकरी चिंतित होते की ? आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही ?

अखेर प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची चिंता आज मिटलेली आहे; कारण काल दिनांक 15 जून 2023 रोजी राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आजच्या लेखामध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस देण्यात आलेली मंजुरी, त्याबद्दलचा शासन निर्णय, योजनेची कार्यपद्धती, पोर्टल, निधी वितरणाची कार्यपद्धती इत्यादीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

नमो शेतकरी योजना GR

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्यथा बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य शासनाच्या अनुदान योजनेची भर घालून ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

लाभार्थी पात्रता व निकष काय असतील ?

  • सदर योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येतील.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले व शासनाच्या निकषानुसार पात्र ठरलेले सर्व लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील.
  • याचप्रमाणे केंद्रशासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी लागू राहतील.
  • नव्याने नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना देखील पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करून लाभ मिळवता येईल.

योजनेची कार्यपद्धती

पीएम किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरित करत असताना लाभार्थी ठरलेले शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवर बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

हफ्ता केव्हा मिळेल ?

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या PM Kisan योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँकखात्यावर कृषी विभागामार्फत वितरित करण्यात येईल.

अ.क्र.हप्ता क्रमांककालावधीरक्कम
1पहिला हफ्तामाहे एप्रिल ते जुलैरु. 2,000/-
2दुसरा हफ्तामाहे ऑगस्ट ते नोव्हेंबररु. 2,000/-
3तिसरा हफ्तामाहे डिसेंबर ते मार्चरु. 2,000/-
नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा

निष्कर्ष : शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय खूपच आनंददायी ठरणार आहे; कारण बहुतांश शेतकरी योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून सदर योजनेचा लाभ आपल्याला केव्हा मिळेल?याची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आता शासन निर्णय आल्यानंतर लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात येईल ही चांगलीच बाब आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ?

शासनाकडून नुकताच जीआर प्रदर्शित करण्यात आलेला आहे, त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल म्हणजेच पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कुठे करावे ?

तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासून लाभ मिळत असेल, तर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.

नमो शेतकरी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

नमो शेतकरी योजना राज्यात केव्हापासून राबविण्यात येत आहे ?

नमो शेतकरी योजना राज्यात 15 जून 2023 पासून राबविण्यात येत आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

1 thought on “नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR) आला ! 12 हजार रुपयांचा लाभ फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार”

Leave a Comment