मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील पात्र नागरिकांना पाच लाखापर्यंत विविध वैद्यकीय उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी आपल्याला गोल्डन कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावा लागतो.
संपूर्ण राज्यभरामध्ये आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी नुकतेच ग्रामपंचायतमध्ये कॅम्पसुद्धा ठेवण्यात आलेले होते. जर तुम्ही अद्याप आयुष्मान भारत योजना कार्ड किंवा गोल्डन कार्ड काढलेला नसेल, तर गोल्डन कार्ड तुम्हाला काढता येणार आहे. त्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाच आहे.
Ayushman Bharat Yojana Maharashtra list 2023
आयुष्मान भारत योजनेचे वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत. जवळपास सर्व वैद्यकीय उपचारासाठी आयुष्मान भारत कार्डचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये विविध शस्त्रक्रियेचा समावेश आहे.
♦️ हे पण वाचा : ही योजना देणार वैद्यकीय उपचारासाठी 5 लाख रु. आर्थिक सहाय्य
गोरगरीब लोकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या दवाखान्यामध्ये उपचार घेणे शक्य नसते, त्यामुळे अशा गरजू लोकांना पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार या योजनेअंतर्गत शासनाकडून दिले जातात.
आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी कागदपत्रं
- लाभार्थी आधारकार्ड
- रेशनकार्ड
- मोबाईल क्रमांक
- बायोमेट्रिक अंगुठा Access
गोल्डन कार्डचे मुख्य फायदे
- 5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार
- विविध दवाखान्यांचा समावेश
- 5 लाखापर्यंत संपूर्ण खर्च शासनाकडून असणार
- कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी ही योजना लागू
आयुष्मान भारत कार्ड कसा काढावा ?
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सहभाग नोंदवून गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत याठिकाणी संपर्क करू शकता. या ठिकाणी तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड संपूर्ण:त मोफत काढून देण्यात येईल.
वरील ठिकाणाव्यतिरिक्त तुम्ही जवळील csc केंद्र, आपले सरकार केंद्र याठीकाणी गोल्डन कार्ड काढून घेऊ शकता. गोल्डन कार्ड काढण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला 50 ते 100 रुपये फी आकारणी केली जाऊ शकते.
आयुष्मान भारत कार्ड Download Process
गोल्डन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला शासनामार्फत देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही गोल्डन कार्ड काढते वेळेस देण्यात आलेला मोबाईल क्रमांक अथवा आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमचा गोल्डन कार्ड डाउनलोड करू शकता.
आयुष्मान भारत योजना काय आहे ?
गरजू लोकांसाठी शासनमार्फतची महत्त्वपूर्ण वैद्यकीय योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते.
आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
जर तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत दवाखाना किंवा जवळील सीएससी केंद्र, आपले सरकार, महा-ई सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करता येतो.
आयुष्मान भारत योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
आयुष्मान भारत योजनेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वरील रखाण्यामध्ये देण्यात आलेली आहे.
आयुष्मान भारत कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढण्यासाठी किती रुपय लागतात ?
गोल्डन कार्ड काढण्यासाठी शासनाकडून कोणतीही फी आकारली जात नाही परंतु तुम्ही सीएससी केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रावर गोल्डन कार्ड काढत असल्यास पन्नास ते शंभर रुपये तुम्हाला आकारले जाऊ शकतात.