कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023, असा करा ऑनलाईन अर्ज; 20 हजार रु. अनुदान मिळणार : Kadba Kutti Yojana 2023

By Admin

Updated on:

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करत असताना मशागतीची व इतर कामे सोयीस्कर व सोप्यापद्धतीने करता यावीत. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनामार्फत कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना महाराष्ट्र (Subsidy Scheme) राज्यासाठी सुरू करण्यात आली.

कडबा कुट्टी मशीन योजना 2023 (Kadba Kutti Anudan Maharashtra)

आधुनिक काळातसुध्दा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, शेळ्या किंवा इतर पाळीव पशु, प्राणी असतात. शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून किंवा जमिनीसाठी शेणखत, दूधदुपत होईल हा विचार करून पशुचा, जनावरांचा सांभाळ करत असतो.

🔴 हे पण वाचा : शेतकऱ्यांचा दुआ ! हवामान अंदाजक पंजाबराव डख कोण आहेत ? जाणून घ्या !

ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे असतील, त्यांना जनावरांना चारा-पाणी व्यवस्थित करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीसुद्धा एक शेतकरी असाल व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्यासाठी शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच chaff Cutter machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.

कडबा कुट्टी मशीनचे खूप फायदे (Benefits) आहेत. जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या साह्याने जलद गतीने व नासाडी न होता कापता येतो, त्याचप्रमाणे यंत्राच्या साह्याने चाऱ्याची कापणी केल्यामुळे चारा बारीक कापण्यात येतो; परिणामी जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.

कडबा कुट्टी मशीन अनुदान व किंमत (Chaff Cutter Price & Subsidy)

कडबा कुट्टी मशीनची किंमत (Price) सामान्यता: 10 हजारापासून 40 हजारापर्यंत आहे. शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता, कडबा कापण्याची गती (3HP,5HP) यानुसार कडबा कुट्टी मशीनची किंमत ठरवली जाते. कडबा कुट्टी मशीनमध्ये मानवचलित व स्वंयचलित अशा दोन यंत्राचे प्रकार आहेत. मानवचलित स्वस्त, तर स्वयंचलित कडबा कुट्टी यंत्र महागडे असतात.

योजना संपूर्ण नावकडबा कुट्टी मशीन अनुदान योजना
विभागकृषी विभाग
लाभार्थी वर्गशेतकरी
लाभ स्वरूप20 हजार रुपयांपर्यंत अनुदान
अर्जाची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कडबा कुटी मशीनसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं, तर इतर शेतकऱ्यांना ही अनुदान मर्यादा 16 हजार रुपयापर्यंत आहे.

कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्र (Documents)

  • शेतकऱ्यांचा आधारकार्ड (Aadhar)
  • बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook)
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • 8अ उतारा
  • पिकांची माहिती
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज कसा करावा ? (Chaff Cutter Online Application)

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी Online Application Form भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करून कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केली जाते व शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन अनुदान दिलं जात.

👇👇👇👇

🌐 ऑनलाईन अर्ज कसा करावा? येथे क्लिक करा


कडबा कुट्टी मशीनसाठी कोठे अर्ज करावा ?

शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी कडबा कुटी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

कडबा कुटी मशीन अनुदान सर्वांना मिळणार का ?

या योजनेअंतर्गत लॉटरी पद्धतीने अर्जदारांची निवड केली जाते, त्यामुळे ज्या अर्जदारांची निवड झालेली आहे अशा अर्जदारांना अनुदान देण्यात येईल.

कडबा कुटी मशीनची किंमत (Price) किती असते ?

कडबा कुटी मशीनची किंमत (Price) सामान्यता 10 हजारापासून 40 हजारापर्यंत आहे.

कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान किती दिलं जात ?

कडबा कुटी मशीनसाठी अनुदान 50% दिलं जातं, ज्याची कमाल मर्यादा 20 हजार रुपयापर्यंत आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment