Land Record : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची कागदपत्र म्हणजे शेतजमिनीचा सातबारा, 8अ उतारा, फेरफार नक्कल इत्यादी होय. पूर्वी ही कागदपत्रं मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असत.
आता कागदपत्रं एका क्लिकवर मिळणार
शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयात शेतजमिनी संदर्भातील विविध कागदपत्रासाठी हेलपाटी मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व कागदपत्र ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा काही दिवसापासून महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली.
🔴 हे पण वाचा भाऊ : आता शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रु. मिळणार; नवीन योजना सुरू
आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर सातबारा, 8अ उतारा, फेरफार नक्कल, मिळकत पत्रिका इत्यादी ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या मोबाईलवरती किंवा जवळील ऑनलाईन सेंटर, सीएससी केंद्र, महा-ई-सेवा केंद्रावर काढता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहेत.
शेतकरी सहजरित्या त्यांच्या मोबाईलवरतीसुद्धा डिजिटल स्वरूपातील सातबारा (Digital Land Record) 8अ उतारा, फेरफार इत्यादी पाहू शकतात. या ठिकाणी आपण डिजिटल सातबारा ऑनलाईन कश्याप्रकारे काढावा? याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
ही कागदपत्रं मिळणार ऑनलाईन
- गाव नमुना 8अ
- सातबारा (7/12 उतारा)
- फेरफार नक्कल
- घराचा उतारा
- मालमत्ता कागदपत्र
- प्रॉपर्टी कार्ड
कोणती कागदपत्र कोणत्या कामासाठी आवश्यक ?
सातबारा : शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांच्या नावावर आहे, हे दर्शवणारा मालकी हक्काचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा (Land Record) होय, यालाच अधिकार अभिलेख पत्रकसुद्धा म्हणतात. शेतजमीन, जागा इत्यादी प्रॉपर्टी नावावर असल्याबाबत शासकीय मान्यता प्राप्त असलेला एक मात्र कागदपत्र म्हणजे सातबारा.
8अ उतारा : 8अ उतारासुद्धा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी वापरला जाणारा पुरावा असून एका व्यक्तीच्या नावावर किती ठिकाणी जमीन आहे ? हे सहजरीत्या या उताऱ्यावर उपलब्ध होतं.
फेरफार उतारा : एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जमीन विक्री केल्यानंतर हक्कविक्रीकरण रद्द होऊन खरेदी केलेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन होते. खरेदी करणारा जमिनीचा मालक होतो व त्या मालकाचे नाव सातबारा उताऱ्यावरती येतं. त्यामुळे फेरफार उतारासुद्धा तितकंच महत्त्वाचं कागदपत्र आहे.
मिळकत पत्रिका : मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड होय. एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे. ही माहिती प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून सहजरीत्या लक्षात येते.
कागदपत्रांसाठी शुल्क किती ?
शेतकऱ्यांना सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार नक्कल इत्यादी कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येकी 15 रु. शुल्क आकारला जातो. मिळकत पत्रिकेसाठी ग्रामीण भाग असल्यास 45 रु. तर शहरी भागासाठी 90 रु. आणि महानगरपालिकेसाठी 135 रु. इतकं ऑनलाईन शुल्क आकारल जातं.
शेतकऱ्यांना सातबारा , 8अ उतारा, फेरफार नक्कल किंवा नागरिकांना मिळकत पत्रिकेसाठी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे फोन-पे, गुगल-पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड (Debit, Credit Card) इत्यादी पद्धतीने नागरिक, शेतकरी पेमेंट करू शकतात.
👇👇👇👇