(अर्ज सुरू) तार कुंपण योजना महाराष्ट्र 2023 : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

By Admin

Updated on:

मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांना शेतरस्ता, वहीवाट, यंत्र खरेदी, बी-बियाणे अशा विविध बाबीसाठी अनुदान (Subsidy) देण्यात येत. आज आपण तार कुंपण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या भोवताली शेतीला लोखंडी तार कुंपण ओढण्यासाठी अनुदान दिलं जात.

तार कुंपण योजना काय आहे ?

मराठवाडा व इतर काही भागात सोडता दुर्गम व आदिवासी भागात शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांचं जंगली आणि पाळीव प्राण्यापासून संरक्षण त्याचप्रमाणे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये तार कुंपण (Tar Kumpan) कराव लागत.

🛑 भाऊ हे पण वाचा : मिनी डाळ मिलसाठी शासन देणार 1.50 लाख रु. अनुदान योजना

तार कुंपण करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकांचे संरक्षण करता यावं, यासाठी शासनाकडून तार कुंपण अनुदान योजना (Tar Kumpan Subsidy Scheme) सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून शासन शेती भोवताली काटेरी तार कुंपण ओढण्यासाठी जवळपास 90 टक्के अनुदान देत.

तार कंपनी योजना डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पअंतर्गत राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठी म्हणजेच Wire Fencing Subsidy Scheme साठी 90% पर्यंत अनुदान देण्यात येतं.

योजना संपूर्ण नावशेतीला तार कुंपण योजना
प्रकल्पडॉ.श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प
लाभ स्वरूप2 क्विंटल तार, 30 सिमेंट खांब
अर्जप्रक्रीयाऑफलाईन
शासन निर्णययेथे क्लिक करून पहा !

तार कुंपण योजना अटी व नियम

  • तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमणात नसावं.
  • अर्जदारांनी तारकुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावं.
  • सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेतीव्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागेल.
  • तार कुंपण योजनेचा लाभ मिळवायचा झाल्यास, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीबाबतचा ठराव ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती / वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार व 30 खांब पुरविण्यात येतील. ज्यासाठी 90% अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल.
  • तर उर्वरित 10% रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या हिस्यातून भरावी लागेल.

तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश ?

शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाच जंगली जनावरापासून होणारं नुकसान टाळणे.

तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करावा? कागदपत्रं कोणती लागणार? येथे क्लिक करा

शेतीला लोखंडी ताराच कंपाऊंड करून शेतकऱ्यांच होत असलेलं नुकसान या योजनेअंतर्गत भरून येणार आहे. काही शेतकऱ्यांसाठी Tar Kumpan Yojana अत्यंत लाभदायक ठरत आहे.


तार कुंपण योजना काय आहे ?

शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेती भोवताली ताराच कंपाउंड ओढण्यासाठी अनुदान देणारी शासनाची योजना.

तार कुंपण योजनेसाठी अनुदान किती देण्यात येत ?

तार कुंपण योजनेसाठी विविध प्रवर्गानुसार व क्षेत्रनिहाय अनुदान देण्यात येतं. उच्चतम अनुदान मर्यादा 90 टक्के आहे.

शेतीला तार कुंपण अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांना संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा लागतो.

तारबंदी, तार कुंपण योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

तार कुंपण योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठीच लागू आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment