Panjabrao Dakh कोण आहेत ? त्यांचा हवामान अंदाज 99% खरा कसा ठरतो?

By Admin

Published on:

Panjabrao Dakh : नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सध्यास्थितीत गाजलेल एक नाव म्हणजे पंजाबराव डख होय. शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान देणारा जणू देवदूतच म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात पंजाबराव डक यांना अचूक हवामान अंदाजक म्हणून ओळखल जातं; परंतु पंजाबराव डख नेमकं कोण आहेत? त्यांच शिक्षण किती? पंजाब डख पाटील काय करतात? त्यांना शेतजमीन किती आहे? पंजाबराव डख पाटील यांचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲप ग्रुप काय? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Panjabrao Dakh कोण आहेत ?

पंजाबराव डख कोण आहेत? ही माहिती (information) आपण आज मराठीमध्ये जाणून घेणार आहोत, त्यापूर्वी आपण एक ब्रीदवाक्य पाहूयात, “जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे काय उगाच लोक म्हणत नाहीत” या ब्रीद वाक्यातून आपल्याला असं लक्षात येत की, महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्हासुद्धा कुठ कमी नाही; कारण प्रसिद्ध व तज्ञ अचूक हवामान अंदाजक पंजाबराव डख पाटील साहेब परभणी या जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पाऊस कधी व कोणत्या महिन्यात किती तारखेला पडणार? दिवसा पडणार की रात्री, पावसाच प्रमाण किती असणार? याची अगदी तंतोतंत माहिती देणारी महाराष्ट्र राज्यातील एकमात्र हवामान तज्ञ व्यक्ती म्हणजे पंजाबराव डख. विविध व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पंजाबराव डख राज्यातील शेतकऱ्यांना मागील 26 वर्षापासून हवामानाचा अभ्यास करून हवामान बदलाची अचूक व तंतोतंत माहिती वेळोवेळी देत असतात. राज्याच्या हवामान खात्याकडून करोड रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सॅटॅलाइट यंत्राला पण इतकी अचूक माहिती देता येत नाही, तितकी अचूक माहिती पंजाबराव डख देतात.

संपूर्ण नावपंजाबराव डख (Panjabrao Dakh)
मूळ रहिवाशी गावगुगळी, धामणगाव
कार्यतज्ञ हवामान अंदाजक
शिक्षण ?ETS ,CTC
शेती किती ?10 एकर शेती
अधिकृत संकेतस्थळलवकरच..

Panjabrao Dakh Biography (संपूर्ण माहिती)

अचूक हवामान अंदाजक पंजाबराव डक हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी, धामणगाव या ठिकाणचे रहिवाशी असून पंजाब डक स्वतः एक प्रगतशील शेतकरीसुद्धा आहेत. वाड-वडिलांपासून कुटुंब शेतकरी वर्गातील असल्यामुळे लहानपणी त्यांना टीव्हीवर नेहमी हवामान अंदाज ऐकण्याची सवय लागली होती. हवामान अंदाज ऐकल्यानंतर डख साहेब आपल्या वडिलांसोबत पावसाच्या अंदाजवर चर्चा करत असतं.

Panjabrao dakh photos
Panjabrao Dakh Photo in Self Farm

📌 Panjabrao Dakh Maharashtra 2023

पंजाबराव डख टीव्हीवरील हवामान अंदाज तसेच त्यांचा स्वतःचा हवामान अंदाज याचं निरीक्षण करत असत, आपल्या सभोवतांच्या हवामान बदलाच, हवामान अंदाजच बारकाईने निरीक्षण करून नोंद करत असतं. लहानपणी त्यांनी केलेली निरीक्षण तंतोतंत बरोबर ठरायची, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना अचूक पावसाचा अंदाज कळाल्यामुळे शेतीत होणार नुकसान टाळता यायचं.

हवामानाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असताना शेतकऱ्यांच्या प्रति त्यांची तळमळ अगदी साफ दिसते. साधारण राहणीमान व उच्च विचार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जणू हवामान दुतच पंजाब डख बनले आहेत. अगदी 1 रुपयासुद्धा कोणाकडून न आकारता मागील कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना हवामान अंदाज मोफत देण्याच काम डख साहेब करत आहेत.

पंजाबराव डख यांचं शिक्षण (Education)

पंजाब डख हे व्यवसायाने शेतकरी असून सध्यास्थितीत ते त्यांच्या गावातील शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कालांतराने, पंजाबराव डख यांनी निसर्गाचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण, संगणक, उपग्रह आणि नकाशे यांचा वापर करून स्वारस्य विकसित केले आहे. त्यांनी C-DAC मध्ये एक कोर्स देखील पूर्ण केलेला असून त्यामुळे त्याच्या ज्ञान आणि हवामान अंदाजात मोठी भर पडली आहे.

त्यांना शेतजमीन किती आहे ?

पंजाबराव डख यांना 10 एकर म्हणजेच चार हेक्टर शेती असून हवामानाच्या आधारावर ते आधुनिक शेती करतात. शेतामध्ये हंगामानुसार हरभरा, सोयाबीन इत्यादी पिकं घेतली जातात. हवामानाचा व शेतीचा अचूक व योग्य अंदाज असल्यामुळे पंजाबराव डख शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवतात. त्यांना साधारणता अंदाजित 200 क्विंटल इतका शेतमाल होतो, ज्यामध्ये सोयाबीन, हरभरा या पिकांचा समावेश आहे. डख यांचं शेतीमधून वार्षिक उत्पन्न (Annual Income) जवळपास 6,00,000 ते 8,00,000 लाख इतकं आहे.

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज खरा कसा ठरतो ?

हवामान विभागाकडून देण्यात येणारी माहिती कधीकाळी उलट पडू लागली, हवामान वर्तवल्यापेक्षा वेगळेच काहीतरी घडू लागलं, त्यामुळे बहुतांश शेतकरी सरकारी हवामान खात्याच्या हवामान अंदाजामुळे निराश झाले; परिणामी हवामान खात्याची विश्वासहर्ता कमी झाली. याच दरम्यान परभणी जिल्ह्यातील पंजाबराव डख या तज्ञ हवामान अंदाजक शेतकऱ्यांनी राज्यातील नागरिकांना अचूक हवामान अंदाज देऊन मन जिंकण्यास सुरुवात केली.

📌 हे पण वाचा : 👇

पंजाबराव डख साहेब कोणत्याही प्रकारची भाकीत सांगत नाहीत, तर शास्त्रशुद्ध व सखोल निसर्गाच्या हवामानाचा अंदाज घेऊन या आधारे शेतकऱ्यांना माहिती देत असतात. मित्रांनो, तुम्हालासुद्धा जरा पंजाबराव डख यांचा दैनंदिन हवामान अंदाज बघायचा असेल, तर तुम्ही panjabrao dakh weather today असा कीवर्ड सर्च करून त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या रोजच्या हवामान अंदाजची माहिती मिळवू शकता.

Panjabrao Dakh मोबाईल नंबर (Contact Number)

पंजाबराव डख महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हवामान तज्ञ असल्यामुळे त्यांना रोज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना हवामान अंदाजाची माहिती द्यावी लागते. अशावेळी डख साहेबांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक नागरिकांना भेटल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर कॉल्स येण्यास सुरुवात होतील. त्यामुळे त्यांचा कोणताही वैयक्तिक मोबाईल क्रमांक देण्यात आलेला नाही; परंतु त्यांच्यामार्फतच्या अचूक हवामान अंदाजासाठी शेतकरी त्यांच्या यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करू शकतात.

पंजाबराव डख whatsapp group महाराष्ट्र

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळावा, यासाठी तब्बल 500 ते 700 व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. ज्याच्या माध्यमातून Panjabrao Dakh Live हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. व्हाट्सअप ग्रुपवर पंजाबराव डक रोजचे हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत शेअर करत असतात. त्यांचा यूट्यूब चैनलसुद्धा असून त्यावरती अचूक हवामान अंदाजाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतात.

निष्कर्ष : मित्रांनो, आतापर्यंत आपण पंजाबराव डख पाटील यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती पाहिली. खरंच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा सुपुत्र शेतकऱ्यांसाठी काजव्यापेक्षा कमी नाही; कारण शेतकऱ्यांसाठी शेती करत असताना सर्वात महत्त्वाचा अंदाज म्हणजे हवामान अंदाज होय. पंजाबराव डख हवामान अंदाज अचूक देतात यात काही शंकाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व ते रासणीपर्यंत डख यांचा हवामान अंदाज खूप मोलाचा ठरतो; परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचं होणार नुकसान कमी-फार प्रमाणात टाळत.

Panjabrao Dakh कोण आहेत ?

पंजाबराव डख परभणी जिल्ह्यातील एक शेतकरी अचूक हवामान अंदाजक आहेत.

पंजाबराव डख यांच मूळ गाव कोणतं ?

पंजाबराव डख याचं मूळ गाव परभणी जिल्ह्यातील गुगळी, धामणगाव हे आहे.

Panjabrao Dakh यांचा हवामान अंदाज खरा का ठरतो ?

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज एका भक्कम पद्धतीवर आधारित आहेत. विस्तृत संशोधन, प्रत्यक्ष निरीक्षणे, उपग्रह प्रतिमा आणि संगणक मॉडेल अंदाजांची अचूकता सुनिश्चित करतात.

पंजाबराव डक यांना शेती किती आहे ?

पंजाबराव डक यांना चार हेक्टर म्हणजेच 10 एकर शेती आहे.

पंजाबराव डख यांचा मोबाईल क्रमांक कुठे मिळेल ?

पंजाबराव डख यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक देण्यात आलेला नाही; परंतु तुम्ही त्यांच्या अधिकृत यूट्यूब चैनलवरती पाहू शकता.

पंजाबराव डख व्हाट्सअप ग्रुप कसा जॉईन करावा ?

पंजाबराव डख यांचा व्हाट्सअप ग्रुप तुम्ही चैनलच्या माध्यमातून जॉईन करू शकता.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.