मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यात 2024 पासून सुरु, शासन निर्णय आला | Mukhyamantri Vayoshri Yojana

By Admin

Updated on:

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना Maharashtra राज्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. 3000 पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सध्यास्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजीत एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखाली दिव्यांग दुर्बल ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी वयोश्री योजना सुरू केली आहे.

वयोश्री योजनेअंतर्गत कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येईल? योजनेचा मुख्य फायदा काय? Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra साठी लागणारी कागदपत्रे कोणती? ऑनलाईन अर्ज कसा करावा? यासंदर्भातील शासन निर्णय (GR) याबद्दलची संपूर्ण माहिती संबंधित लेखामध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठीतील महत्वाची माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.

Mukhyamantri Vayoshri Yojana Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना
सुरू करणारमहाराष्ट्र शासन
योजनेचा उद्देशज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत
लाभस्वरूपएकरकमी 3,000 रु.
लाभार्थीराज्यातील ज्येष्ठ नागरिक
वयोमर्यादा65 वर्षांपेक्षा जास्त
अर्जाची प्रक्रियाऑनलाईन
शासन निर्णययेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटलवकरच पोर्टल सुरु होणार..
Mukhyamantri Vayoshri Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता (Eligibility)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्य शासनाकडून काही निकष ठरविण्यात आलेले आहेत, यामधील काही महत्त्वपूर्ण निकष किंवा अटी शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत, त्या तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

 • लाभार्थी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
 • लाभार्थी व्यक्तींकडे आधार कार्ड किंवा आधार कार्डसाठी केलेला अर्ज, नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी अर्जदारांची एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांच्या आत असावी, याबाबत लाभार्थ्यांनी स्वयघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून विनामूल्य उपकरण प्राप्त केलेले नसावे.
 • पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रु. 3,000 रकमेची उपकरण खरेदी केल्यासंदर्भातील व प्रशिक्षण घेतल्या संदर्भातील प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
 • निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थी संख्यांपैकी 30 टक्के महिला असतील.

वयोश्री योजना स्वरूप

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी जास्त नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता व दुर्बलतेनुसार खालीलप्रमाणे उपकरणे खरेदी करता येतील. उपकरणा व्यतिरिक्त केंद्रशासनाच्या धार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्यशासनाकडून नोंदणीकृत करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र याठिकाणी सहभाग होता येईल.

 • चष्मा श्रवणयंत्र
 • ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर
 • कमोड खुर्ची
 • नि-ब्रेस
 • लंबर बेल्ट
 • सर्वाइकल कॉलर इत्यादी

मुख्यमंत्री वयोश्री योजना pdf शासन निर्णय

राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जीआर (GR) म्हणजेच शासन निर्णय 06 फेबुरवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. ज्याच्या माध्यमातून लाभार्थी जेष्ठ नागरिकांना लवकरच एकरकमी एकावेळी 3000 रु रक्कम DBT प्रणालीच्या माध्यमातून आधार संलग्न बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे. सदर योजनेचा संपूर्ण शासन निर्णय PDF मध्ये तुम्ही वरील रखाण्यात पाहू शकता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना फायदे (Benefits)

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अनेक फायदे आहेत. यापैकी मुख्य फायदे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील दुर्बल व दारिद्ररेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी 3,000 रु मिळतील. ज्यामुळे उतारवयात व्याधी व आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या आवश्यकतेनुसार विविध वैद्यकीय उपकरण खरेदी करता येतील. यासोबतच राज्यशासनाकडून नोंदणीकृत करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र याठिकाणी सहभाग नोंदविता येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे (Documents)

Mukhyamantri Vayoshri योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. त्यामधील काही कागदपत्रं अनिवार्य असून काही पर्यायी आहेत.

 • आधारकार्ड/मतदान कार्ड
 • राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
 • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
 • मोबाईल क्रमांक
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • स्वयं-घोषणापत्र
 • शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज (Apply Online)

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. याबद्दलचा महत्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला व त्यासंदर्भातील शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे; परंतु अद्याप मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रिया किंवा रजिस्ट्रेशन यासंदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.

अद्याप मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन सुरु झालेली नसल्यामुळे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (last date) शासनाकडून देण्यात आलेली नाही. ऑनलाईन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवर यांबद्दलची माहिती अद्यावत करण्यात येईल.

💎 हे पण वाचा : महाराष्ट्रातील महिलांसाठी विविध प्रकारच्या 11 योजना

राष्ट्रीय वयोश्री योजनेप्रमाणेच Mukhyamantri Vayoshri Yojana ची अर्ज प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला जर राष्ट्रीय वयोश्री योजनाअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा असेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करू शकता.

 • सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला Registration Form वर क्लिक करावे लागेल.
 • संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यावा, फॉर्ममधील कोणतीही माहिती अपूर्ण सोडू नये, अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
 • अर्जामध्ये देण्यात आलेली सर्व कागदपत्रं PDF किंवा इमेज फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत. कागदपत्रांची यादी वेबसाइटवर असेल.
 • शेवटी राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठीचा फॉर्म सबमिट करावयाचा आहे.

वरीलप्रमाणे Mukhyamantri Vayoshri Yojana साठीचा फॉर्म आपल्याला लवकरच भरता येईल. कारण संपूर्ण जाहिरात, शासन निर्णय आणि निधी तरतुदीची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे. Online अर्ज सूरू झाल्यानंतर अर्ज कसा करावा? याबद्दलची माहिती आपल्या वेबसाईटवर अपडेट करण्यात येईल.

रू. 3,000 एकरकमी एकवेळी Mukhyamantri Vayoshri Yojana अंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना देण्यात येईल.

साधारणता महाराष्ट्र वयोश्री योजनेसाठी लाभार्थ्यांचा आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक, शासनाकडील ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र लागतात.

ऑनलाईन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारची वेबसाईट, पोर्टल सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पोर्टल सुरू झाल्यानंतर करता येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment