विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच शिक्षण मिळावं; म्हणून राज्यशासन व केंद्रशासनाकडून सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. यामध्ये विद्याधन स्कॉलरशिप, सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना, अब्दुल कलाम आर्थिक सहाय्य योजना, शैक्षणिक व्याज परतावा योजना, श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना, स्वाधार योजना, इत्यादी विविध नव्यानं सुरू करण्यात आलेल्या योजनांचा समावेश आहे. या विविध योजनांची माहिती तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.
- सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना
- अब्दुल कलाम आर्थिक सहाय्य योजना
- शैक्षणिक व्याज परतावा योजना
- श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना
- महाराष्ट्र स्वाधार योजना
Vidyadhan Scholarship 2024
सरोजनी दामोदरन फाउंडेशनमार्फत विद्याधन स्कॉलरशिप योजना दरवर्षी राबविण्यात येते. विद्याधन शिष्यवृत्ती संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती असून सदर शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना Scholarship दिली जाते.
शिष्यवृती संपूर्ण नाव | Vidyadhan Scholarship |
राबविणारी संस्था | सरोजनी दामोदरन फाउंडेशन |
संस्था स्थापना | 1999 |
लाभार्थी वर्ग | 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी |
लाभ स्वरूप | 10 वी, 12 वी साठी 20,000 रु. शिष्यवृती |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सरोजिनी दामोदरन फाउंडेशनची स्थापना 1999 मध्ये श्री.एस. डी. शिबुलाल (सहसंस्थापक, इन्फोसिस) आणि श्रीमती कुमारी शिबुलाल (व्यवस्थापकीय विश्वस्त) यांनी केली होती. आजपर्यंत फाउंडेशनमार्फत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि दिल्ली या विविध राज्यात 27,000 हून अधिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित केल्या आहेत. सध्यास्थितीत विद्याधन स्कॉलरशिपमध्ये तब्बल 4700 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पात्रता (Eligibility Criteria)
विद्याधन स्कॉलरशिपसाठी कोण अर्ज करू शकतात ? याबद्दलचीसुद्धा माहिती जाणून घेणं तितकंच महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असेल, अशा कुटुंबातील विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवू शकतात. विद्यार्थी 2024 मध्ये दहावी परीक्षा 85% किंवा 9 CGPA अथवा 75% किंवा 7 CGPA याप्रकारे उत्तीर्ण असावा.
Vidyadhan Scholarship Amount
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना Vidyadhan Scholarship योजनेच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी म्हणजेच इयत्ता 11वी आणि 12वी साठी अनुक्रमे दरवर्षी 10,000 रु. इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. अकरावीत ऍडमिशन घेतल्यानंतर 10 हजार रु. व बारावीत ऍडमिशन घेतल्यानंतर 10 हजार रु. असे एकंदरीत विद्यार्थ्यांना 2 वर्षात 20,000 रु. सदर स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्जदार विद्यार्थ्यांची निवड प्रारंभिक शैक्षणिक कामगिरी व अर्जातील नमूद इतर तपशिलाच्या माध्यमातून करण्यात येईल.
- निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी व मुलाखत घेतलेली जाईल, त्यासाठी विद्यार्थ्यांना हजर राहावे लागेल.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा, मुलाखतीची तारीख वेळ आणि स्थान इत्यादीची माहिती वैयक्तिकरित्या त्यांना ईमेल आयडीवर किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
- निश्चित प्रकरणांमध्ये, विद्यार्थी व पालकांचा प्रवास खर्च शिष्यवृत्ती समितीकडून परतावा म्हणून परत करण्यात येईल.
Vidyadhan Scholarship साठी कागदपत्रं (Documents)
- उत्पन्नाचा दाखला
- 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक
- बँक खात्याचा तपशील
- विद्यार्थी अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- आधार कार्ड
Vidyadhan Scholarship Last Date
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023
• स्क्रीनिंग टेस्ट : 16 सप्टेंबर 2023
• मुलाखत व चाचणी : 09 ते 20 ऑक्टोबर 2023
अर्ज कसा करावा ? (Online Apply)
विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन कराव लागेल, त्यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व आवश्यक कागदपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांना फाउंडेशनकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होम पेजवर Apply For Scholarship असा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी शिष्यवृत्ती संबंधित व विद्यार्थी संलग्न मूलभूत माहिती विचारण्यात येईल.
- संपूर्ण शैक्षणिक, मूलभूत व शिष्यवृत्ती संबंधित माहिती काळजीपूर्वक भरून घ्यावी.
संपर्कासाठी माहिती (Contact)
- Sarojini Damodaran Foundation 678, 11th Main Rd, 4th T Block East, 4th Block, Jayanagar, Bengaluru, Karnataka – 560041
- Phone Number – (+91)-734-935-4415
- Contact Person (Jacob Sukumar R) – 7339659929
- Email Id – vidyadhan.tamilnadu@sdfoundationindia.com
शिष्यवृत्ती आणि अर्ज प्रक्रियाबद्दलचा व्हिडिओ | येथे क्लिक करा |
विद्याधन स्कॉलरशिप अर्जासाठी लिंक | येथे क्लिक करा |
विद्याधन स्कॉलरशिप योजना काय आहे ?
सार्वजनिक दामोदरं फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारी महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजेच इयत्ता 11वी व 12वी साठी एकंदरीत 20,000 रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.
विद्याधन शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहेत ?
विद्याधन शिष्यवृत्तीसाठीची पात्रता वरील लेखांमध्ये देण्यात आलेली आहे, तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचा कौटुंबिकच उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असेल व इयत्ता दहावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 90% घेतलेली असतील अशी विद्यार्थी यासाठी पात्र असतील.
विद्याधन स्कॉलरशिप 2024 शेवटची तारीख काय आहे ?
विद्यार्थ्यांना विद्याधन स्कॉलरशिपसाठी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
विद्याधन स्कॉलरशिपसाठी कोणती विद्यार्थी पात्र असतील ?
Vidyadhan Scholarship साठी गरीब कुटुंबातील विद्यार्थी लाभार्थी असतील.