ऑनलाईन Ferfar Download कसा करावा? : Digital eFerfar Download

By Admin

Updated on:

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं कागदपत्र म्हणजे जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा होय. या मूलभूत कागदपत्राशिवाय काहीवेळी शेतकऱ्यांना शेतीशी निगडित इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. ज्यामध्ये शेतजमिनीचा जुना किंवा नवीन Ferfar Download करणे, प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा नकाशा, चतुरसीमा इत्यादी महत्वकांक्षी कागदपत्रांचा समावेश असतो.

Ferfar म्हणजे काय ?

ऑनलाईन फेरफार डाऊनलोड कसा करावा ? ही माहिती पाहण्यापूर्वी फेरफार म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाच आहे. शेताच्या बाबतीत विषय निघाला की, तुम्ही खूप वेळा फेरफार हा शब्द ऐकला असेल. फेरफार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून महसूल विभागाच्या दृष्टीने कोणत्याही कारणास्तव गाव नमुना 7 व 12 यामधील कायदेशीर मान्यतेने करण्यात आलेला बदल म्हणजे फेरफार होय.

फेरफार संकल्पना थोडक्यात समजून घेण्यासाठी एक उदाहरण पहा. समजा एखाद्या व्यक्तीने आपली मालकी हक्काची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली, तर विकणाऱ्या व्यक्तींचा गाव नमुना 7 मधील जमिनीवरील हक्क रद्द होऊन त्याठिकाणी विकत घेणाऱ्या नवीन व्यक्तींच नाव जोडलं जातं याच बदलास किंवा प्रक्रियेस फेरफार नोंद म्हणतात. फेरफार नोंद झाल्यानंतर एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. तो आपल्याला गाव नमुना सातवर आढळून येतो.

उतारा प्रकारई-फेरफार डाऊनलोड
विभागमहसूल विभाग
लाभार्थी वर्गशेतकरी
सेवा शुल्करु. 15 प्रति फेरफार
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Online Ferfar Download

शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीशी निगडित विविध लाभ घरबसल्या व जलदगतीने मिळविता याव्यात यासाठी विविध सुविधा विकसित करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये ऑनलाईन जुना किंवा नवीन फेरफार डाऊनलोड करणे, डिजिटल सातबारा व आठ अ उतारा डाऊनलोड करणे, जमिनीचा प्रॉपर्टी कार्ड, भू-नकाशा ऑनलाईन डाऊनलोड इत्यादींचा समावेश आहे. याठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जमिनीचा ऑनलाईन Ferfar Download कसा करावा ? याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

फेरफार डाऊनलोडसाठी फी किती ?

ऑनलाईन फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी सामान्यता: शेतकरी किंवा नागरिकांना 15 रु. इतका शुल्क आकारला जातो. त्यासाठी फेरफार डाऊनलोड करण्यापूर्वी फेरफार पोर्टलवरती देण्यात आलेला रिचार्ज पर्याय वापरून वॉलेटमध्ये आपल्या गरजेनुसार निश्चित रक्कम क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून जमा करावी लागते. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ई फेरफार डाऊनलोड करता येतो. वॉलेटमध्ये अधिकतम रक्कम जमा करण्याची मर्यादा 1,000 रु. ठेवण्यात आलेली आहे.

Ferfar Download कसा करावा ?

  • ऑनलाईन फेरफार डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात शेवटी डावीकडे न्यू युजर रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून अर्जदारांची नवीन नोंदणी करून घ्यावी.
Ferfar Download Maharashtra
Registration
  • नोंदणी करत असताना अर्जदाराची मूलभूत माहिती जसे मोबाईल क्रमांक, नाव, आडनाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी, पत्ता, व्यवसाय इत्यादी माहिती टाकून सोबतच युजरनेम व पासवर्ड व्यवस्थित टाकावा, त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे.
eFerfar Download
Ferfar Download
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर परत होमपेजवर येऊन नोंदणी करताना टाकण्यात आलेला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय दिसतील, त्यामध्ये Digitally Signed eFertar या पर्यायावर क्लिक करून तुमचा संबंधित सर्वे नंबर/गट नंबर टाकून तुम्ही फेरफार पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता.
Ferfar Download
Ferfar Download Process

अश्याप्रकारे तुम्ही एकदम पद्धतीने घरबसल्या तुमच्या मोबाईलवरती डिजिटल ई-फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता, त्यासाठी तुम्हाला पूर्वीप्रमाणे तलाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता नाही. महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व आगाऊ पैसे नक्कीच वाचतील.

फेरफार ऑनलाइन कसा तपासावा ?

ऑनलाईन फेरफार पाहण्याची किंवा डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया वरील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

आँनलाईन फेरफार उतारा कसा शोधावा ?

ऑनलाईन फेरफार उतारा शोधण्यासाठी सर्वप्रथम महाभुमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल, त्यानंतर तुमचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक टाकून तुम्ही फेरफार उतारा शोधू शकता.

डिजिटल ई-फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करावा ?

शेतकऱ्यांना डिजिटल ई-फेरफार उतारा ऑनलाईन महाभुमिअभिलेख वेबसाईटवरती डाऊनलोड करता येतो, त्यासाठी त्यांना 15 रु. शुल्क आकारल जात.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment