शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 15 लाख रु. कर्ज मिळणार : श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना

By Admin

Updated on:

Shramvidya Educational Loan Scheme : मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी काल दिनांक 19 मे रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी सहज सोप्यापद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहूयात.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना 2023 संपूर्ण माहिती

एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व राज्यातील सहकारी बँकेच्या सहाय्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना राज्यात सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत लवकरच शून्य टक्के व्याजदराने सहकारी बँकेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षणासाठी कर्ज देण्यात येईल.

योजना संपूर्ण नावश्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना
विभागशैक्षणिक विभाग
लाभार्थी वर्गआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुल-मुली
लाभ स्वरूप5 लाखापासून 15 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज
शासन निर्णय (GR)अद्याप आला नाही

नव्यानी सुरू करण्यात आलेल्या या शैक्षणिक कर्ज योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,”आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेचा उद्धार करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आली आहे.”


लाभ कोणाला मिळणार ?

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार आहे. ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी 12वी उत्तीर्ण झाला असेल, तर पुढील पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

Shramvidya Shaikashnik karj Yojana Maharashtra 2023 Key Points : 👇

  • कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.
  • 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतचे पारितोषिक बक्षीस देण्यात येईल.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना 2023 व्याजदर

  • 5 लाखापर्यंतचे कर्ज : 0% व्याजदर
  • 5 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज : 2% व्याजदर
  • 10 ते 15 लाखापर्यंतचे कर्ज : 4% व्याजदर

अर्ज कसा करता येईल ? (Application Process)

मित्रांनो, ही योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे पुढील 2 ते 3 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक बँकामार्फत करण्यात येईल आणि त्यानुसार शैक्षणिक कर्ज वाटपाची जी काही प्रक्रिया असेल, ती सुरू करण्यात येईल.

🌾 शेतकरी योजनायेथे क्लिक करा
🔔 सरकारी योजनायेथे क्लिक करा
🔰 शासन निर्णययेथे क्लिक करा
⚖️ रेशन न्यूजयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment