विद्यार्थ्याना शिक्षणासाठी 51,000 रु. मिळणार; स्वाधार योजना 2023 माहिती, पात्रता, अटी, फॉर्म PDF, ऑनलाईन अर्ज

By Admin

Updated on:

गोरगरीब, वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची खूप आवड असते; परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याकारणाने अश्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. या गोष्टीचा विचार करून शासनाकडून स्वाधार योजना (Swadhar Scheme) महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आली.

स्वाधार योजना काय आहे ?

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना (Scheme) सुरू करण्यात आलेली असून यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

🔴 हे पण वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांना NEET, CET साठी मोफत टॅबलेट मिळणार

स्वाधार योजनेअंतर्गत 10वी, 12वी, पदवी, व्यवसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक सहाय्य (Financial) म्हणून मदत केली जाते, ही मदत शासकीय अथवा महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, बोर्डिंगसाठी व इतर शैक्षणिक सुविधांसाठी देण्यात येते.

स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आज आपण स्वाधार योजना काय आहे ? यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणती ? स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

योजनेचे संपूर्ण नावडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
सुरू करणार राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात2016-17
विभागसमाजकल्याण विभाग
लाभार्थी वर्गअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी
लाभ स्वरूपराहण्यासाठी प्रतिवर्ष 51,000 रु. आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://sjsa.maharashtra.gov.in

स्वाधार योजना आर्थिक मदत कशी मिळणार ?

स्वाधार योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी राहायची सुविधा उपलब्ध नसेल; अशा परिस्थितीमध्ये बोर्डिंग निवास व इतर शैक्षणिक कामासाठी 51 हजार रुपये आर्थिक मदत खालीलप्रमाणे केली जाते.

  • बोर्डिंग सुविधासाठी 28,000 रु.
  • निवास सुविधासाठी 15,000 रु.
  • वैद्यकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 5,000 रु.
  • इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5,000 रु.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र (Documents)

  1. विद्यार्थ्यांचा आधारकार्ड (Aadhar Card)
  2. बँक पासबुक झेरॉक्स (आधार लिंकिंग आवश्यक)
  3. मागील शिक्षणाची कागदपत्रं
  4. मोबाईल क्रमांक
  5. उत्पन्न प्रमाणपत्र
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. जातीचा दाखला

स्वाधार योजना अटी व शर्ती

  • जर एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावीनंतर एखाद्या कोर्सअंतर्गत स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छित असेल, तर विद्यार्थी करत असलेल्या कोर्सचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
  • स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक.

स्वाधार योजनासाठी अर्ज कसा करावा ? (Swadhar Yojana Application Process)

विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत लाभ (Benefit) मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रासह सदरचा अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात जमा करावा लागेल. वरील नमूद रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रु. आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रु. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी वाढीव दोन हजारासह रक्कम देण्यात येईल.

स्वाधार योजना अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
स्वाधार योजना PDF फॉर्म येथे क्लिक करा
विविध योजनांच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा

स्वाधार योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

स्वाधार योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

स्वाधार योजनेसाठी शासनाची कोणती अधिकृत वेबसाईट आहे ?

स्वाधार योजनेसाठी शासनाची https://sjsa.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

स्वाधार योजनेचा लाभ कोणाला मिळेल ?

स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मिळेल.

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा ?

स्वाधार योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने संबंधित समाजकल्याण विभागाकडे सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment