मिनी डाळ मिलसाठी 1.50 लाखापर्यंत अनुदान; असा करा अर्ज : Mini Dal Mill Yojana Maharashtra 2023

By Admin

Updated on:

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृद्ध करण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT Subsidy) पोर्टलच्या माध्यमातून विविध अशा योजना राबविल्या जातात. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मिनी डाळ मिल अनुदान योजना होय.

मिनी डाळ मिल योजना

मिनी डाळ मिल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष करून महिलांना शेतीसोबत इतर पूरक व्यवसाय (Business) करून उत्पन्न मिळवता यावा, यासाठी अनुदान दिलं जातं. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “उन्नत शेती समृद्ध शेतकरी आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान” या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिनी दाल मिल वाटप केलं जातं.

♦️ हे पण वाचा : महिलांना व्यवसायासाठी 2 रु. लाख कर्ज देणारी शासनाची योजना

कमी भांडवलामध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी मिनी डाळ मिल यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. शेतामधील धान्याची मळणी करून आणल्यानंतर त्याचे दाळीमध्ये रूपांतर करण्यासाठी डाळ मिल यंत्राचा वापर केला जातो. डाळ मिल उद्योग हा कमी भांडवलामध्ये चांगले पैसे कमवून देणारा व्यवसाय असून शासन यासाठी अनुदान (Subsidy) सुद्धा देत.

या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, मिनी डाळ मिल योजना काय आहे ? यासाठी किती अनुदान देण्यात येईल ? अर्ज कसा करावा इत्यादी थोडक्यात माहिती.

योजना संपूर्ण नावMini Dal Mill Subsidy Scheme
विभागकृषी विभाग
लाभ स्वरूप1.50 लाख रु. अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मिनी डाळ मिलसाठी अनुदान किती ? (Mini Dal Mill Scheme Subsidy)

शेतकऱ्यांना मिनी डाळ मिलसाठी 60% व 50% अनुदान दिलं जात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला यांना 60 टक्के अनुदान देण्यात येईल, तर इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येईल. अनुदानाची उच्चतम मर्यादा 1.50 लाख इतकी असेल.

डाळ मिल योजनेसाठी आवश्यक कागदपत्र (Documents)

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा 7/12 व 8अ उतारा
  • GST बिल
  • दुकानदारकडील कोटेशन बिल
  • शेतकरी हमीपत्र
  • करारनामा

मिनी डाळ मिल योजनेसाठी अर्ज कसा करावा ? (Online Application)

शेतकरी महिला किंवा संस्थांना मिनी डाळ मिल योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अर्जदार तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात.

मिनी डाळ मिल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा झाल्यास अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागतो. अर्ज करताना शेतकऱ्यांना खालील पद्धतीने अर्ज करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


मिनी डाळ मिलसाठी अनुदान (Subsidy) किती देण्यात येतं ?

मिनी डाळ मिलसाठी 60% अनुदान प्रवर्गनिहाय दिलं जातं, ज्याची उच्चतम अनुदान मर्यादा 1.50 लाख रु. इतकी आहे.

मिनी डाळ मिल अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

मिनी डाळ मिल योजना फक्त महाराष्ट्र राज्यसाठी लागू आहे.

मिनी डाळ मिल योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

मिनी डाळ मिल योजनेसाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने MahaDBT पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment