डाळ मिल सबसिडीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज : Government Dal Mill Subsidy Scheme

  • अर्जदारांनी नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन अश्या प्रकारचे तीन घटक दिसतील. त्यामधील कृषी यांत्रिकीकरण या घटकासमोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर मुख्य घटक > कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य > प्रक्रिया संच > मिनी डाळ मिल > क्षमता 80 ते 120 किलो
  • वरीलप्रमाणे सर्व बाबी निवडल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करून घ्यायचा आहे.
  • जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पहिल्यांदा अर्ज करत असाल तर 23.60 रु. इतकी ऑनलाईन पेमेंट तुम्हाला अर्जासाठी करावी लागेल, जर यापूर्वी तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत एखाद्या घटकासाठी अर्ज केलेला असेल, तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
  • अर्ज केल्यानंतर अर्जाची पावती तुम्हाला लगेच पीडीएफ स्वरूपात मिळेल.

लॉटरी पद्धतीने तुमची निवड झाल्यास तुमच्या मोबाईलवरती निवड झाल्याबद्दलचा एसएमएस तुम्हाला कृषी विभागाकडून पाठवण्यात येईल. त्यानंतर कागदपत्र अपलोड करणे, जीएसटी बिल इत्यादी प्रक्रिया करून तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती (Bank Account) डीबीटी प्रणाली अंतर्गत अनुदान देण्यात येईल.