शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी नवीन पोर्टल सुरू : MahaDBT Farmer New Website/Portal

By Admin

Published on:

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल (MahaDBT New Website) विकसित करण्यात आलेला असून या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टलवरती तांत्रिक अडचण असल्याकारणाने शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी अर्ज करताना अडचणी निर्माण होत होत्या, यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात होता, अपितू योजनांचा लाभसुद्धा घेता येत नव्हता यामुळे शासनाच्या कृषी विभागामार्फत 25 जानेवारी 2023 पासून शेतकऱ्यांसाठी हा नवीन पोर्टल चालू करण्यात आला.

MahaDBT Farmer New Website/Portal

शेतकरी व इतर लाभार्थी नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासनामार्फतचा जुना महाडीबीटी पोर्टल अद्यावत करून नवीन महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा : ७/१२ वर आता जमिनीचा नकाशासुध्दा मिळणार

या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवड अनुदान, कृषी यांत्रिकीकरण घटकातील विविध योजना, शेती अवजारासाठी अनुदान, सिंचन बाबीसाठी अनुदान इत्यादी विविध शेती संबंधित उपकरणांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

वेबसाईट/पोर्टलमधील मुख्य बद्दल

  • नवीन पोर्टल किंवा वेबसाईटच्या अर्ज प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही पूर्वी अर्ज करत होता त्याचप्रमाणे अर्जाची प्रक्रिया असेल.
  • नवीन वेबसाईटमधील Apperance व Interface जुन्या वेबसाईटप्रमाणेच असणार आहे. यामुळे पर्याय निवडताना किंवा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारचा संभ्रमण होणार नाही.
  • यामध्ये फक्त महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे युआरएल/डोमेन (URL/Domain) मध्ये इतकचं.

तुम्हाला नवीन वेबसाईट उघडण्यासाठी लिंक खाली देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून विविध योजनांसाठी तुम्ही आता फॉर्म भरू शकता; कारण या वेबसाईटवरील सर्व तांत्रिक अडचणी दुरुस्त करण्यात आलेले आहेत.

MahaDBT Farmer New Website/Portal

नवीन पोर्टल/वेबसाईटयेथे पहा
जूना पोर्टल/वेबसाईटयेथे पहा
MahaDBT Farmer New Website/Portal

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment