अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत 4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली, त्या बैठकीत मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.
शासनाच्या या महत्त्वकांक्षी निर्णयामुळे मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेत असताना मोठा फायदा होणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहुयात.
Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship Yojana
4 जुलै 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती (Scholarship) योजना सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. सदर योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येईल.
मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही, हीच बाब लक्षात घेता या समाजातील विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून “क्यू-एस वर्ल्ड रँकिंग” मध्ये 200 च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमधील विविध कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
योजना संपूर्ण नाव | सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना |
विभाग | शैक्षणिक विभाग |
लाभार्थी वर्ग | मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी |
लाभ स्वरूप | परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | sarthi-maharashtragov.in |
सारथी परदेशी शिष्यवृत्ती योजना 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना सारथी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
कोणत्या Course साठी मिळणार लाभ
- अभियांत्रिकी (Engineering)
- वास्तुकला (Architecture)
- व्यवस्थापन (Management)
- विज्ञान (Science)
- वाणिज्य-अर्थशास्त्र (Commerce-Economics)
- कला (Arts)
- विधी (Law)
- औषध निर्माण (Medicine)
वरील विविध अभ्यासक्रमासाठी 50 पदव्युत्तर, पदवी, पदविका व 25 डायरेक्ट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सामान्यता परदेशात नामांकित असलेल्या सर्व अभ्यासक्रमाचा समावेश सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. सदर योजनेसाठी 05 वर्षाकरिता 275 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या वर्षासाठी 25 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?
सयाजीराव गायकवाड सारथी परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिला जाणार आहे, ज्यामध्ये काही उपजातीचा सुद्धा समावेश असेल, जशाप्रकारे मराठा, कुणबी कुणबी-मराठा, मराठा-कुणबी इत्यादी. महाराष्ट्रातील Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship Scheme अंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
स्कॉलरशिप किती आणि कशी मिळणार?
सदर योजनेतून मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही शिष्यवृत्ती मासिक स्वरूपातील असेल, परदेशात शिकण्यासाठी Scholarship दिली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जास्तच मिळेल, यात काही अपवाद नाही.
या योजनेला नुकतीच मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेली असल्यामुळे सदर योजनेचा कोणताही शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना दरमहा किती शिष्यवृत्ती देण्यात येईल याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship Yojana Online Application form
सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजनासाठी विद्यार्थ्यांना Online Form भरावा लागणार आहे. जर तुम्हाला सदर योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही खाली देण्यात आलेली प्रक्रिया करून सविस्तर ऑनलाईन अर्ज भरू शकता.
- सर्वप्रथम सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यासाठी येथे क्लिक करा.
- वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना असा एक नवा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता उघडलेला सारथी शिष्यवृत्ती योजना फॉर्म सूचनेनुसार योग्य व काळजीपूर्वक भरून घ्या.
- त्यानंतर अर्जामध्ये सांगण्यात आलेली आवश्यक ती कागदपत्र अपलोड करा.
- संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या भरून कागदपत्र अपलोड केल्यानंतर, Submit या बटणावर क्लिक करून तुमचा अंतिम अर्ज दाखल करा.
- फॉर्म दाखल केल्यानंतर तुमचा अर्ज सारथी संस्थेकडे पाठवला जाईल, जर तुम्ही सदर योजनेसाठी पात्र असाल, तर संस्थेकडून तुम्हाला शिष्यवृत्ती मान्यतेचा संदेश तुमच्या नोंदणीकृत करत मोबाईलवरती पाठवण्यात येईल.
वेबसाईटवरती अद्याप फॉर्म भरण्यासाठीचा ऑप्शन आलेला नसेल, तर विद्यार्थ्यांनी काही काळासाठी प्रतीक्षा करावी किंवा सारखे मान्यता प्राप्त केंद्रात जाऊन सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा.
सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजना काय आहे?
सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजना राज्य शासनाकडून मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजनेसाठी किती रु. शिष्यवृत्ती देण्यात येईल?
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दरमहा दिली जाईल, सध्या ही स्कॉलरशिप योजना नवीन असल्यामुळे अद्याप या संदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध नाही.
सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्यासाठी व विद्यार्थ्यांसाठी लागू आहे?
ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
सयाजीराव गायकवाड सारथी स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, यासंदर्भात लवकरच आमच्या यूट्यूब चैनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येईल.
⭕ निष्कर्ष : मराठा, कुणबी समाजासाठी आत्तापर्यंत कोणतीही परदेशी शिष्यवृत्ती योजना शासनाकडून राबविली जात नव्हती; परंतु आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मदत होणार आहे. शासनाकडून मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेण्यात आलेला हा एक महत्त्वकांक्षी निर्णय ठरणार आहे.
📌 हे सुध्दा वाचा : 👇👇