E Peek Pahani : खरीप 2023 ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, ई-पीक पाहणी करा; अन्यथा मिळणार नाही पीक विमा व अनुदान

By Admin

Updated on:

शेतकरी मित्रांनो, दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा ई-पीक पाहणीला (E Peek Pahani) सुरुवात झालेली आहे. राज्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खरीप 2023 च्या पेरण्या झालेल्या आहेत. 1 जुलै 2023 पासून शेतकरी खरीप ई-पीक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन अँड्रॉइड एप्लीकेशन अपडेट करण्यात आलेलं आहे.

E Peek Pahani 2023 | ई-पीक पाहणी 2023

शेतकऱ्यांनाही ई पीक पाहणी करण्यासाठी आता कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलवर शेतकरी सहज व सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंद करू शकतात. शेतकऱ्यांना खरीप 2023 ई पीक पाहणी करण्यासाठी प्ले-स्टोअरवरून जुना एप्लीकेशन अपडेट करून घ्यावा लागेल किंवा त्याऐवजी जुना एप्लीकेशन काढून टाकून नवीन ई पीक पाहणी अँड्रॉइड एप्लीकेशन (e Peek pahani app) इन्स्टॉल करावा लागेल.

ई-पीक पाहणी नवीन ॲपयेथे क्लिक करून डाऊनलोड करा

15 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणीची मोहीम सुरू करण्यात आली. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते. राज्यामध्ये सध्यास्थितीला 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्यांची नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे दिवसेंदिवस ई पीक पाहणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

प्रकल्प संपूर्ण नावई पीक पाहणी
राबविणार राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
लाभार्थी वर्गराज्यातील शेतकरी
उद्देशपिकांच नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावा
नोंदणी पद्धतॲपच्या सहाय्याने
अधिकृत ॲपE Peek Pahani App

ई-पीक पाहणी नवीन सुविधा

 • Geo Fencing सुविधा
 • शेतकरी ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता
 • किमान 10% तपासणी तलाठ्यांमार्फत
 • 48 तासात ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
 • किमान आधारभूत किंमत नोंदणी सुविधा
 • मिश्र पिकांमध्ये इतर 3 मुख्य पीक नोंदविण्याची सुविधा
 • संपूर्ण गावाची ई पीक पाहणी बघण्याची सुविधा
 • ॲपबाबत अभिप्राय रेटिंगची सुविधा
 • खाता अपडेट करण्याची सुविधा

ई पीक पाहणी App डाउनलोड

मित्रानो, तुम्हाला तुमच्या पिकांची खरीप किंवा रब्बी ई-पीक पाहणी करावयाची असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम e peek pahani app डाउनलोड करावा लागेल. त्यासाठी Playstore वर जाऊन तुम्ही ई पीक पाहणी हा कीवर्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल, इन्स्टॉल या बटणवर क्लिक करून तुम्ही ई-पीक पाहणीचा नवीन version 2.0.0.11 इन्स्टॉल करू शकता अथवा थेट अँप डाउनलोड करण्याची लिंक वरील रखाण्यामध्ये देण्यात आली आहे.

📣 तुमची ई पीक पाहणी यशस्वीरित्या झाली का नाही ? अशी चेक करा मोबाईलवर

ई-पीक पाहणी लिस्ट

शेतकरी मित्रांनो, तुमच्या संबंधित गावातील ई पीक पाहणीची यादी (List) पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ई पीक पाहणी अँप इन्स्टॉल असणं महत्त्वाचं आहे. ई-पीक पाहणी ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसतील. ई-पीक पाहणी लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला शेवटचा पर्याय ‘गावाचे खातेदारांची पीक पाहणी’ या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर संबंधित गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची यादी दिसेल. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली असेल, त्यांचं नाव व ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली नसेल, त्यांचसुद्धा नाव दाखवलं जाईल.

E Pik Pahani Last Date 2023

अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची शेवटची तारीख तोंडावर आलेली असतानासुद्धा पिकाची नोंद केलेली नाही, त्यामुळे महसूल विभागाकडून पूर्वीची ई-पीक पाहणीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 ऐवजी, आता मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना 1 महिना 15 दिवसाचा वाढीव कालावधी दिला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्या पिकाची ऑनलाईन नोंद करता येणार आहे.

E Peek Pahani Online Maharashtra

शेतकरी बांधवांना, आपल्या शेतातील पिकांची, फळ झाडांची, पडीक जमिनीची, विहीर अथवा बोरवेलची नोंद आपल्या मोबाईल वरती करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. ई पीक पाहणी ऑनलाईन नोंद (Registration) करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सुशिक्षित शेतकरी फक्त 5 मिनिटाच्या आत ई-पीक पाहणी मोबाईलवरून करू शकतात. जर तुम्हाला ही पिक पाणी करता येत नसेल, तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहूनसुद्धा खरीप ई-पीक पाहणी करू शकता.

 • मोबाईलवर ई-पीक पाहणी कशी करावी ?
 • ई-पीक पाहणी करताना पडीक जमीन नोंद कशी करावी?
 • ई-पीक पाहणी विहीर बोर नोंद कशी करावी ?
 • ई पीक पाहणी नोंदणी 2023
 • ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड
आँनलाईन E Peek Pahani कशी करावी ? 👆

ई पीक पाहणी कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

ई पीक पाहणी फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

ई पीक पाहणी म्हणजे काय ?

ई पीक पाहणी हा एक सर्वेक्षण ॲप असून याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करता येते. शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी प्रकल्प शासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे.

ई पीक पाहणी नवीन ॲप कोठून डाऊनलोड करता येईल ?

शेतकऱ्यांना नवीन ई पीक पाहणी ॲप प्ले-स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

46 thoughts on “E Peek Pahani : खरीप 2023 ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, ई-पीक पाहणी करा; अन्यथा मिळणार नाही पीक विमा व अनुदान”

 1. आमच्या अमरावती जिल्ह्यातील गाव बोपनाबाद ता.नादगांव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे अजुन ही समाधान कारक पाऊस पडला नाही पेरणी झाल्यावर किती दिवसांनी नोंद करण्यात यावी याबद्दल माहिती मिळावी अशी विनंती ☘️👏

  Reply
  • काही अडचण नाही, ई पीक पाहणी चालू झाल्यापासून तुम्ही 3 महिन्यापर्यंत पिकाची नोंद करू शकता..

   Reply
  • नवीन ॲप इंस्टॉल करा..नाहीतर अपडेट करून परत try करा..सध्या थोडा सर्व्हर issue सुध्दा चालू आहे.

   Reply
 2. MAZA MOBILE NUMBER REGISTER ASUN PIK PAHANI SUBMIT KARTANA MASSEGE YETO TUMCHI PIK PAHIN DUSARYA MOB NUMBER VER TRANSFR KARNYAT ALI

  Reply
  • नंबर दुसरा टाकलेला असेल सर एकतर त्या नंबरने लॉगिन करा नाहीतर नवीन नंबरने गट नोंदणी करा

   Reply
 3. मी दोन तीन वेळा मी माझ्या क्षेत्रात घेतल्या गेलेल्या बोअरेल ची नोंद ईपिक पाहणी aap द्वारे घेतली परुंत पंधरा दिवसानंतर ही सातबाऱ्यावर नोंद झाली नाही. कृपया संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का

  Reply
 4. Details fill up kelyanantar ..photo kadhlyanantar app mdhun baher kadhnyat yete…details submit nhi hot ahe…ky krav?

  Reply
 5. shetkaryanchi jmin vegveglya satbaryanvr aste aani ekach jagi naste. photo kadhtana pratyek jagi jav lagel ka?
  ekach shetatale photo upload kele tr chaltil ka

  Reply
  • हो काहीच अडचण नाही; फक्त योग्य त्या पिकांची नोंद करा; कारण इतका Bulk मधील Data म्हणजे फोटो एक एक करून तपासून पाहणे विभागाला शक्य नाही…त्यामुळे प्रत्येक जागचा फोटो अपलोड नाही केलात तरी चालेल

   Reply
  • हो करून पहा ! कधी कधी सर्व्हर प्रॉब्लेममुळे आपली माहिती सबमिट होत नाही.

   Reply
 6. Ekach navni 4 gut no ahe dusrya gut mdhe samayik mdhe Asnyryachya navani upload kele bakiche ekach navani kele ahet kahi adchan hoeil ka

  Reply
  • सर सध्या सर्वरचा प्रॉब्लेम चालू आहे, चिंता करू नका तो लवकरच सोडवण्यात येईल आणि राहिला प्रश्न ई-पीक पाहणीचा, तर त्यासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

   Reply
  • सर ॲप नवीन असल्याची खात्री करून घ्या; अन्यथा प्ले-स्टोरमधून अपडेट करा.. तरी नाही झाल्यास एप्लीकेशनच्या सेटिंगमधून data व cache क्लियर करा… तरीसुद्धा नाही झाल्यास काहीवेळाने प्रयत्न करा, कारण काहीवेळेस server प्रॉब्लेम असल्यामुळे अशी समस्या उद्भवते

   Reply
 7. OTP येत नाही त्या मुले ई पीक पाहणीचे पुढचे प्रोसेस होत नाही एक महिन्या पासून शेतात जाऊन try करून बघत असतो तरी सुधा ॲप ला notification yeat नाही

  Reply
  • सर play store वरून ॲप अपडेट करून घ्या.. तरीसुद्धा होत नसल्यास दुसऱ्या मोबाईल वरून करून पहा नक्की होईल

   Reply
 8. There has been rumours that date of e- peek pahani last date is 25’th September. We are facing troubles in reaching to connect with server and also upload the photos due to reaching out to find location.
  Can you please guide us on this and let us know last date ?

  Reply

Leave a Comment