Gram panchayat Maharashtra : मित्रांनो, राज्य शासनामार्फत जनसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात; परंतु अशा योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या न झाल्यामुळे बहुतांश लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. ग्रामपंचायत मनरेगाअंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात. मनरेगाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
विहीर, गाई गोठा अनुदान योजना
ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करत असताना विविध प्रकारच्या समस्या जनसामान्यांना नागरिकापुढे येतात. यामधील एक महत्त्वाची समस्या म्हणजे विहीर गाय गोठा अनुदान योजनेचे अर्ज न स्वीकारणे, योजनेची योग्य माहिती न देणे, योजनेची सविस्तर माहिती नसणे, योजनेची अंमलबजावणी न होणे किंवा मस्टर न देणे इत्यादी समस्या ग्रामस्तरावर उद्दभवत असतात.
वरील सर्व बाबींचा विचार करता, महाराष्ट्र शासनामार्फत 14 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या नवीन मनरेगा पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे जनसामान्य नागरिकांना विविध योजनासह तक्रारसुध्दा आता एकाच ठिकाणी करता येणार. Gram Panchayat Yojana
ग्रामपंचायत योजनांसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी
सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीचा दरवाजा तुडवावा लागतो. अशावेळी ग्रामपंचायतीमार्फत योजनेची पुरेशी माहिती नसल्याकारणाने किंवा अद्याप ही योजना आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुरू झालेली नाही, अश्या प्रकारची कारण सांगून विविध योजनांची अंमलबजावणी योग्य त्याप्रकारे होत नाही. काही ठिकाणी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतकडून पैशाची मागणीसुद्धा केली जाते.
विहीर मंजुरीसाठी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पैशाची मागणी करणे ही बाब काही नवीन नाही, काही दिवसापूर्वी तुम्ही मंगेश साबळे या फुलंब्रीच्या सरपंचाचा वायरल झालेला व्हिडिओ नक्कीच पाहिलेला असेल. त्यामुळे वरील विविध अशा अडचणीचा विचार करून शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येणार आहे.