गाय, गोठा ग्रामपंचायत योजना ऑनलाईन तक्रार : Gai Gotha, Navin Vihir Online Complaint

Grampanchayat Yojana : मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या विविध योजनांशी संबंधित नागरिकांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास, ते खालीलप्रमाणे प्रक्रिया करून तक्रार नोंदवू शकतात.

 1. सर्वप्रथम नागरिकांना मनरेगा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटची लिंक खालील रखाण्यामध्ये देण्यात आलेली आहे.
 2. वेबसाईटच्या होम पेजला आल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला “रजिस्टर युवर कंप्लेंट” हा पर्याय दिसेल.
 3. या पर्यायावर क्लिक करा.
 4. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पान उघडेल, त्याठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुमचं संपूर्ण नाव त्याठिकाणी टाकून घ्या.
 5. आता तुमच्यासमोर मनरेगाचा डॅशबोर्ड दिसेल, त्या ठिकाणी तुमच्या मागील तक्रारी व नवीन तक्रार करण्यासाठी Register New Complaint हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
 6. आता तुम्ही स्वतःसाठी तक्रार करताय किंवा इतरांसाठी तक्रार दाखल करु इच्छिताय ते निवडा.
 7. पुढील स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा जॉबकार्ड आयडी टाकावा लागेल, (जॉब कार्ड कसा काढावा : येथे पहा ) तुमचा जिल्हा तालुका ग्रामपंचायत आणि गावाचे नाव निवडून पिन कोड टाकावा लागेल.
 8. आता बीडीओ, तहसीलदार, कृषीविभाग यापैकी तुम्हाला ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची असेल ते निवडा.
 9. आता तुमच्या तक्रारीची माहिती त्याठिकाणी तुम्ही 200 शब्दांमध्ये टाकू शकता.
 10. तुम्हाला तुमच्या माहिती,वाद किंवा योजने संदर्भात एखादा पुरावा पीडीएफ फाईल असेल, तर त्या ठिकाणी अपलोड करा.
 11. शेवटी आता सेल्फ डिक्लेरेशन या पर्यायावर क्लिक करून तुमची तक्रार सबमिट या बटणावर क्लिक करून नोंदवा.
 12. आता तुम्ही दाखल केलेला तक्रारीचा एक क्रमांक तुम्हाला देण्यात येईल तो तुम्हाला नोंद करून ठेवायचा आहे. देण्यात आलेल्या क्रमांकाच्या आधारे तुम्ही तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती वेळोवेळी ऑनलाईन पाहू शकता.

अशाप्रकारे मनरेगाच्या विविध योजनांशी संबंधित तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल, तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन नोंदवू शकता.