Kusum Solar Yojana : कुसुम सोलर पंप योजनेसाठी आता कधीही अर्ज करता येणार; अर्जासाठी अंतिम मुदत नाही

By Admin

Published on:

Kusum Solar Yojana : प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्जाची सुरुवात पुन्हा झालेली असून अर्ज करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. मात्र मुदत संपेल म्हणून महाऊर्जेच्या संकेतस्थळावर अनेक शेतकऱ्यांनी एकाच वेळी अर्ज करण्याची प्रक्रिया करत असल्यामुळे सर्व्हरला लोड येऊन वेबसाईट बंद पडत आहे.

Kusum Solar Pump Yojana Online Registration 2023

कुसुम सोलर पंप योजना 2023 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली असून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत अर्जाचा कोटा संपून जाईल म्हणून घाई गडबड केली जात आहे; परंतु वास्तविक पाहता अर्ज करण्यासाठी महाऊर्जा कडून कोणत्याही प्रकारची अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता सावकाश व व्यवस्थितरित्या अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप केले आहे.

कुसुम सोलर पंप अर्जासाठी शेवटची दिनांक ? (Kusum Solar Pump Last Date)

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाऊर्जाने अर्जाची सुरुवात तर केलेली आहे; परंतु अर्ज करण्यासाठी अद्याप मुदत संपलेली नाही म्हणजेच सौर कृषी पंपासाठी अंतिम मुदत ठरवण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा. प्रत्येक जिल्ह्यासाठीचा कोटा उपलब्ध आहे, वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर करून प्रत्येक जिल्ह्याचा कोटा दिवसाआड उपलब्ध करून दिला जात आहे, त्यामुळे संकेतस्थळ सुरू राहील अशी माहिती महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी दिली.

इतक्या शेतकऱ्यांनी केली नोंदणी !

17 मे 2023 पासून सुरू झालेल्या सौर पंप योजनेसाठी आज पर्यंत या दहा दिवसात राज्यातील 23 हजार 584 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी अर्ज केला ? या संदर्भातील अधिक माहिती तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी अर्ज केला ?

शेतकऱ्यांच्या बांधावर 58 हजार कृषीपंप

  • प्रधानमंत्री कुसुम सोलरपंप योजना अंतर्गत पात्र व इच्छुक शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपाच वाटप केलं जातं.
  • योजना सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी 01 लाख पंपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.
  • सप्टेंबर 2021 पासून सुरू झालेल्या कुसुम सोलरपंप योजनेत आत्तापर्यंत 58 हजार कृषी पंप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसविण्यात आलेले आहेत.
  • महाऊर्जाकडून पूर्वीच्या अर्जाप्रमाणेच नव्याने अर्ज मागविण्यासाठी 17 मे 2023 पासून सुरुवात केलेली आहे, यासाठीची अधिकृत अधिसूचनासुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत देण्यात आलेली होती.
  • सोलर पंप ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्यापासून बहुतांश शेतकऱ्यांनी वेबसाईटवर नोंदणीसाठी एकाच वेळी प्रयत्न केला, त्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. राज्यभरातून अर्ज भरता येत नसल्याच्या जवळपास 280 तक्रारी शुक्रवारपर्यंत संबंधित विभागाकडे आल्या होत्या.
  • राज्यातील संपूर्ण अर्जाचा विचार केला, तर पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 2 हजार 729 अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment