नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना प्रवासात 50% सूट देण्याची Mahila Sanman Yojana घोषित करण्यात आली होती. त्यासंदर्भातील अधिकृत GR आलेला असून, कालपासून महिलांना ST प्रवासात सरसकट 50% सवलत दिली जाणार आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
Mahila Sanman Yojana 2023
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवासामध्ये विविध सवलती दिल्या जातात. राज्यामध्ये जवळपास 30 प्रकारच्या विविध सवलती राज्यशासनाकडून महामंडळामार्फत राबविण्यात येतात. या सवलतींची रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला अदा करण्यात येते.
♦️ हे पण वाचा : महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्स व सोबत 35% अनुदान
ST प्रवासामध्ये विशेष महिलांसाठी सवलत देणारी कोणतीही योजना उपलब्ध नसल्याने, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करण्यात आली.
फक्त ST च्या याच गाड्यांत सवलत
महिलांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साधी, मिडी/मिनी, निमआराम, विनावातानुकूलित, शयन-आसनी, शिवशाही, शिवनेरी, शिवाई इत्यादी सर्व बसेसमध्ये सरसकट 50 टक्के सवलत मिळणार आहे. याव्यतिरिक्त भविष्यात राज्य परिवहन मंडळामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेससाठी ही योजना लागू असेल.
महिला सन्मान योजना सूचना व माहिती
- सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना’ या नावाने ओळखली जाईल.
- सदर योजना महाराष्ट्र राज्याच्या अंतिम हद्दीपर्यंत सर्व महिलांसाठी लागू असेल.
- महिला सन्मान योजना शहरी भागातील वाहतुकीसाठी लागू असणार नाही.
- ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाचे बसच्या प्रवासाचा परवाना किंवा आरक्षण तिकीट आधीच काढलेले असेल, तर अशा महिलांना 50% सवलत देण्यात येणार नाही.
- सर्व महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत असली तरी योजनेअंतर्गत जे प्रवासी ऑनलाइन टिकिट, विंडो बुकिंग, मोबाईल ॲप किंवा इतर आरक्षणाद्वारे तिकीट घेतील, अशा सर्व प्रवाशाकडून सेवा प्रकार निहाय लागू करण्यात आलेला आकार वसूल करण्यात येईल.
- 75 वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रक नियमानुसार 100 टक्के सवलत लागू असेल.
- 65 ते 75 या वयोगटातील महिलांना ‘Mahila Sanman Yojana’ हीच सवलत देण्यात येईल.
- 05 ते 12 या वयोगटातील मुलींना यापूर्वीप्रमाणे, जशी 50 टक्के सवलत लागू होती, तीच सवलत यापुढे सुद्धा लागू राहील.
महिलांच्या सन्मानासाठी शासनामार्फत हा उचलण्यात आलेला पाऊल खूपच महत्त्वकांशी ठरत आहे. राज्यातील विविध महिलांकडून शासनाच्या या निर्णयचा कौतुक केलं जात आहे. योजनेसंदर्भातील आवश्यक अशी माहिती आमच्यामार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाचा अधिकृत GR खालीलप्रमाणे पाहू शकता.
👇👇👇👇
ST प्रवासात महिलांना 50% सवलतीचा अधिकृत GR येथे पहा
महिला सन्मान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
महिला सन्मान योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना देण्यात येईल ?
राज्यातील सर्व महिलांना ST प्रवासात 50% सूट देण्यात येईल.
महिला सन्मान योजना कधीपासून लागू असेल ?
17 मार्च 2023 पासून ही योजना संपूर्ण राज्यभरात राबविली जाईल.