मित्रांनो, शेतातील मशागतीसाठी व पीक काढणीसाठी विविध यंत्राचा वापर केला जातो. अशा विविध यंत्रासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy) दिलं जातं. शासनामार्फत नुकतीच ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Sugarcane Harvester Subsidy Scheme 2023 Maharashtra
राज्यामध्ये सन 2022-23 व सन 2023-24 या सलग दोन वर्षासाठी शासनाकडून अनुक्रमे 450-450 याप्रमाणे जवळपास 900 ऊस तोडणी यंत्राचे लक्ष्याक साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (RKVY) ऊस तोडणी यंत्रास शासनामार्फत अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे.
♦️ हे सुध्दा वाचा : हार्वेस्टर कापणी यंत्रासाठी 11 लाखापर्यंत अनुदान मिळवा !
दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगारांची संख्या कमी होताना दिसून येत आहे; परिणामी ऊसाची तोडणी योग्य वेळेत न होता मोठ्या प्रमाणावर ऊसाचे नुकसान होत आहे. या कारणाने शासनाकडून ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान उपलब्ध करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
ऊस तोडणी यंत्रामुळे काम जलद गतीने व कमी वेळेत होईल, यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची होत असलेली नासाडी थांबेल. त्याचप्रमाणे ऊस योग्य वेळी तोडणी करून कारखान्यात गेल्यास शेतकऱ्यांना भावसुद्धा चांगला भेटेल. या अनुषंगाने शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी कोण अर्ज करू शकतात ?
ऊस तोडणी यंत्र खरेदीनंतर अनुदान मिळवण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाना, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) इत्यादींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
अटी व शर्ती
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- अर्जदार वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाना, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यापैकी एक असावा.
- पात्र लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र किमतीच्या किमान 20% रक्कम स्व-भांडवल म्हणून गुंतवणूक करावी लागेल, उर्वरित रक्कम ही कर्ज स्वरूपाने उभारण्याची जबाबदारी पात्र लाभार्थ्याची असेल.
- महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर शेतकरी पात्र असतील तर, शासन निर्णयाच्या अधीन राहून अर्जदारांना परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा लागेल.
- महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करताना अनु.जाती व अनु.जमाती लाभार्थ्यांना सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला सादर करावा लागेल.
- ऊस तोडणी यंत्र अनुदानाची रक्कम PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल.
- वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबतीत एकाच कुटुंबातील एका व्यक्तीस एका ऊस तोडणी यंत्रासाठी संपूर्ण योजना कालावधीत एक वेळेस अनुदान अनुज्ञेय असेल, त्याचप्रमाणे शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्थासाठीसुध्दा लागू असेल.
- सहकारी व खासगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त 3 ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान ते असेल.
ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान किती ?
ऊस तोडणी यंत्रासाठी पात्र लाभार्थ्यांना यंत्र खरेदी किंमतीच्या 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, तितकं अनुदान PFMS प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येईल. आणखी एक महत्त्वाची बाब पात्र लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र किमतीच्या किमान 20% रक्कम स्व-भांडवल म्हणून गुंतवणूक करावी लागेल.
ऊस तोडणी यंत्र ऑनलाईन अर्ज
ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी म्हणजेच Sugarcane Harvester Subsidy Scheme अंतर्गत Online अर्ज करण्याकरिता अर्जदारांना शासनामार्फत नुकत्याच नवीन चालू करण्यात आलेल्या अधिकृत MahaDBT पोर्टलवर/वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
आँनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा ! |
शासन निर्णय (GR) | येथे पहा ! |
ऊस तोडणी यंत्रासाठी एकंदरीत किती अनुदान शासनाकडून देण्यात येईल ?
ऊस तोडणी यंत्रासाठी यंत्र खरेदी किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तितक अनुदान देण्यात येईल.
ऊस तोडणी (Sugarcane Harvester) यंत्रासाठी अनुदान मिळवण्याकरिता कुठे अर्ज करावा ?
ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी नवीन MahaDBT पोर्टलवर अर्ज करावा लागेल.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
ऊस हार्वेस्टर अनुदान योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
ऊस तोडणी अनुदान यंत्रासाठी कोण अर्ज करू शकतात ?
यासाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था इत्यादींना ऊस तोडणी यंत्रांतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.