PM आवास योजना 2023 : नवीन यादी आली; यादीत तुमचं नाव आहे का ?

By Admin

Published on:

मित्रांनो, आर्थिक व दुर्बल घटकातील नागरिकांसाठी राज्य व केंद्र शासनामार्फत विविध अशा घरकुल योजना राबविण्यात येतात. ज्या मागील मुख्य हेतू असतो वंचित गटातील नागरिकांना किंवा लाभार्थी वर्गाला हक्काचं घर मिळवून देणं.

Pradhan Mantri Awas Yojana List 2023

प्रधानमंत्री आवास योजना ही अशीच एक घरकुल योजना असून या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकात मोडणाऱ्या कुटुंबीयांना गृहनिर्माणसाठी म्हणजेच घर बांधणीसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. ही योजना 2015 पासून सुरू करण्यात आली.

♦️ हे पण वाचा : सावित्रीबाई फुले घरकुल योजना; आता या समाजासाठीसुद्धा घरकुल मिळणार !

अद्याप ही योजना सुरू असून देशभरातील लाभार्थी नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसून येत आहे; कारण गरजू लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य शासनाकडून या योजनेअंतर्गत दिलं जातं.

घरकुल यादीत नाव खालीलप्रमाणे पहा

तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत अर्ज केलेला असेल तर, तुम्हाला खालीलप्रमाणे प्रक्रिया करून या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी पाहू शकता.

  • प्रधानमंत्री आवास योजनेची अद्यावत यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला Citizen Assessment असा एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्याठिकाणी “Track Your Assessment Status” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (Registration No), इतर तपासणीसाठी ची माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, शहर इत्यादी निवडून सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • अर्जाची स्थिती तुमच्या समोर दाखवली जाईल जर तुम्ही पात्र असाल तर संबंधित यादीमध्ये तुमचं नाव त्याठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment