सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उपलब्ध व्हावा या अनुषंगाने शासनामार्फत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र 1 ऑक्टोबर 1988 ला स्थापन करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवकांना व महिलांना मोफत प्रशिक्षण व कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
📣 कन्यादान अनुदान योजना; विवाहासाठी शासन देणार पैसे
सन 2022-23 पासून ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस) यावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्जदारांना प्रमाणपत्र व कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी शासनामार्फत देण्यात आली आहे.
प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, महिलांना मोफत उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत करणे. तसेच स्वतःचा व्यवसायासाठी बँकेकडून गरजू प्रशिक्षनार्थ्याना कर्ज उपलब्ध करून देणे.
नेमकं कोणतं प्रशिक्षण मिळणार ?
प्रशिक्षण सहभागी महिला, मुलींना हेअर कट, हेअर स्टाइल, हेअर वॉश, हेअर मसाज, मेहंदी थ्रीडीग, vaxing, फिशियल, ब्लिच, फेस क्लिनअप, मेकअप इत्यादींबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षण कालावधी किती ?
प्रशिक्षण कालावधी 01 महिन्याचा असणारा असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकरता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे ऑनलाईन प्रस्ताव पाठवून पस्तीस टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
आवश्यक कागदपत्र
ब्युटीपार्लर प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छित असलेल्या महिलांना खालील कागदपत्रासह 8 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा लागेल.
- अर्जदार आधारकार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- बँक पासबुक
- 2 पासपोर्ट फोटो
- जातीचा दाखला (मागासवर्गीय असल्यास)
प्रशिक्षणासाठी शैक्षणिक व इतर पात्रता
- जास्तीत जास्त 40 महिलांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल.
- कमीत कमी 7 वी उत्तीर्ण किंवा ITI, पदवी, पदविका, इत्यादी आवश्यक.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 45 असेल.
- लाभार्थी हा जिल्ह्यातील रहिवासी असावा.
अर्ज कसा करावा ?
पात्र व लाभार्थी अर्जदारांना या प्रशिक्षणाचा मोफत लाभ घेण्यासाठी mced.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Training Program Registration करावे लागेल. अशी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
सूचना : संबंधित प्रशिक्षण फक्त नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्रामार्फत सुरू आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण चालू आहे का नाही ? हे जाणून घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्रास संपर्क करा.