MahaDBT मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं ? जाणून घ्या

By Admin

Updated on:

MahaDBT Subsidy : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmer) पोर्टलच्या माध्यमातून विविध अश्या योजना राबविल्या जातात. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व उपकरण खरेदीसाठी 40 टक्यापासून 100 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं.

MahaDBT Farmer Portal Schemes Government Subsidy

महाडीबीटी पोर्टलमार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या या संकल्पनेला “अर्ज एक योजना अनेक” या नावाने सुध्दा संबोधले जाते. अर्ज एक योजना अनेक या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व साधने, फलोत्पादन इत्यादी उपघटकांचा समावेश आहे.

♦️ हे पण वाचा : शेतकरी योजनांसाठीच महाडीबीटी पोर्टल बदलल ! ही आहे नवीन वेबसाईट

बहुतांश शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या उपकरणासाठी, यंत्र खरेदीसाठी किती अनुदान शासनाकडून देण्यात येतं, याबद्दलची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे शेतकरी अश्या योजनेपासून वंचित राहतात.

मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिलं जातं ? कोणती विविध उपकरणे या योजनेअंतर्गत येतात ? इत्यादी थोडक्यात माहिती.

कोणत्या योजनेसाठी किती अनुदान ?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : ही योजना सिंचन व साधने या घटकांतर्गत येते, यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पीव्हीसी पाईप इत्यादीसाठी महिला, जात प्रवर्गनिहाय अनुक्रमे 45 टक्यापासून 75 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं.

कृषीयांत्रिकीकरण योजना : महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून सर्वात जास्त अर्ज करण्यात येणारी योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित व ट्रॅक्टर विरहित विविध यंत्र अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिले जातात.

राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी 40% पासून 60% पर्यंत अनुदान दिलं जातं.

राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विहीर, कांदाचाळ इतर शेतीपूरक कामासाठी शेतकऱ्यांना 40 ते 60 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात बी-बियाणे, खते इत्यादीच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिलं जात. प्रथमता: शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते, त्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फत बियाणे खरेदी करण्याचा परवाना दिला जातो.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कांदाचाळ, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, शेततळे अस्तरीकरण इत्यादी विविध कामासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिलं जात.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग लागवडीसाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामध्ये विविध फळबाग लागवडीसाठी जशाप्रकारे संत्री, मोसंबी, आंबा, चिंच, जांब, डाळिंब इत्यादीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

इतर महत्वाच्या योजना

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment