प्रधानमंत्री सूर्योदय योजना महाराष्ट्र 2024 ऑनलाईन अर्ज सुरु | Pradhanmantri Suryoday Yojana

By Admin

Published on:

भारतातील नागरिकांसाठी शासनाकडून सतत नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. घरातील विजेची कायमस्वरूपी गरज भागवण्यासाठी आता शासनाकडून प्रधानमंत्री सूर्योदय योजना राबविण्यात सुरु करण्यात आली आहे. आयोध्यामधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली. योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती हवी असेल, तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?

आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान एखाद्या सणाचा किंवा प्रसंगाचा अवचित साधून नागरिकांसाठी नवनवीन भेट किंवा योजना देत असतात. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा संपूर्ण करून दिल्लीत परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, PM Suryoday Yojana नेमकी काय आहे?

पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरावर सोलर सिस्टम बसविण्यात येणार असून यासाठी लागणारा खर्च शासनाकडून दिला जाईल. देशातील गोरगरीब, वंचित नागरिकांना वीज उपलब्ध व्हावी, नागरिकांना मिळणारी वीज स्वस्तात व कायमस्वरूपी मिळावी, हा या योजनेमागील शासनाचा मुख्य उद्देश आहे. पीएम सूर्योदय योजनेमुळे मध्यमवर्गीयांचे विज बिल कमी होईल; परंतु यासोबतच आणखी एक फायदा म्हणजे, ज्याठिकाणी अद्याप वीज पोहोचलेली नाही, त्याठिकाणी या सोलार योजनेचा वापर करून नागरिकांना वीज वापरता येईल.

Pradhanmantri Suryoday Yojana

PM Suryoday Yojana Overview

योजना संपूर्ण नावप्रधानमंत्री सूर्योदय योजना
सुरुवात केव्हा झाली22 जानेवारी 2024
योजना प्रकारसरकारी योजना
संबंधित विभागकेंद्रशासन ऊर्जा विभाग
लाभार्थी वर्गदेशातील नागरिक
लाभ स्वरूपअनुदान रक्कम
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

रुफटॉप सोलर म्हणजे काय?

सूर्योदय योजना काय आहे, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली; परंतु या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला रुफटॉप सोलर म्हणजे नेमकं काय ? तर यामध्ये आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसविण्यात येतात.

📣 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना; व्यवसायासाठी 2 लाखापर्यंत कर्ज मिळवा

पॅनल्स ज्याला आपण प्लेट्ससुद्धा म्हणू शकतो, या प्लेट्स सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषून घेतात आणि ऊर्जेचे रूपांतरण विजेमध्ये करतात. महत्त्वाचं म्हणजे महावितरणकडून किंवा इतर खाजगी संस्थेकडून वितरित केल्या जाणाऱ्या विजेमध्ये आणि सोलर पॅनलमधून तयार होणाऱ्या विजेमध्ये फारसा फरक नसतो.

Suryoday Solar Scheme Eligibility

  • अर्जदार भारतातील रहिवाशी असावा.
  • यापूर्वी अर्जदारांनी शासनाच्या कोणत्याही योजनेतून सोलर पॅनलचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदार लाभार्थी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील असावीत.
  • सूर्योदय सोलार स्किमचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

सूर्योदय योजना कधीपासून सुरु?

ही योजना नेमकं कोणत्या तारखेपासून किंवा कधी सुरू होणार आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून देण्यात आलेली नाही; परंतु लवकरच यासाठीचा अधिकृत शासन निर्णय व रोडमॅप जारी करण्यात येईल, अशी आशा आहे. सध्यास्थिती केंद्रशासनाची रुफटॉप सोलर योजना सुरू आहे, ज्यामध्ये शासनाकडून आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते.

सोलर पॅनलसाठी लागणारा खर्च

रुफटॉप सोलर पॅनलसाठी लागणारा खर्च संपूर्णता: तुम्ही किती क्षमतेचा पॅनल आणि बॅटरी बसवता यावरती अवलंबून असतो. सामान्यता खेड्यापाड्यांमध्ये 1 किलोवॅट क्षमतेचा रुफटॉप सोलर पॅनल बसविण्यात येतो. साधारणता यासाठी 50 हजार ते 1 लाख एवढा खर्च येतो. 5 किलोवॅट क्षमतेच्या रुफटॉप सोलर पॅनलसाठी 2.25 ते 3.25 लाख रु. इतका खर्च येतो. या संपूर्ण खर्चाच्या 40% सबसिडी केंद्रशासना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नॅशनल रुफटॉप स्कीम’ अंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाते.

सूर्योदय योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

PM सूर्योदय योजनेसाठी अद्याप कोणतीही वेबसाईट, पोर्टल शासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. यासंदर्भातील पोर्टल शासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणार असून यासाठीचा अर्ज राष्ट्रीय पोर्टलवर पूर्ण केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय पोर्टलसाठी येथे क्लिक करा.

  • सूर्योदय योजनेसाठी online apply किंवा registration करत असताना अर्जदारांना अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर अर्जदारांचा खाता तयार करण्यात येईल. त्यानंतर लॉगिन करावे लागेल आणि अर्जदारांची आवश्यक ती माहिती जश्याप्रकारे वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादी भरावी लागेल.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर अंतिम अर्ज दाखल करावा लागेल.
  • अर्ज दाखल केल्यानंतर शासनाकडून उपलब्ध पुरवठादारांची यादी तुम्हाला दिसेल, विक्रेता निवडावा लागेल त्यानंतर तुमचा अर्ज महावितरणकडे पाठविण्यात येईल.
  • महावितरणकडून अर्ज मंजूर केल्यानंतर सोलर प्लांट आपल्या छतावरती स्थापित करता येईल. सोलार पॅनल स्थापित झाल्यानंतर संबंधित तपशील अधिकृत वेबसाईटवर नोंद करावी लागेल.
  • अंतिम टप्प्यात अर्जदारांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर संबंधित योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाप्रमाणे रक्कम वितरित करण्यात येईल.

1. प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत देशातील विविध दुर्गम भागातील नागरिकांना 24 तास विजेची उपलब्धता खूपच कमी घरात उपलब्ध करून देण्यासाठी घोषित करण्यात आलेली योजना म्हणजे सूर्योदय योजना होय.

2. प्रधानमंत्री सूर्योदय योजना अधिकृत वेबसाईट कोणती ?

सूर्योदय योजनेसाठी अद्याप कोणताही अधिकृत पोर्टल किंवा वेबसाईट शासनाकडून सुरू करण्यात आलेली नाही; परंतु याची ऑनलाइन अर्ज किंवा नोंदणी प्रक्रिया राष्ट्रीय पोर्टलवर करण्यात येईल अशी माहिती दिली जात आहे.

3. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्जदार online अर्ज किंवा Registration लवकरच अधिकृत पोर्टलवर करू शकतील. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही या लेखाला अद्यावत करू.

4. PM सूर्योदय योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

PM सूर्योदय योजना देशातील संपूर्ण राज्यासाठी लागू आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment