पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं : Crop Loan Required Documents Maharashtra

By Admin

Updated on:

Crop Loan : शेतकरी मित्रांनो, लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतखरेदी व शेतीच्या मशागतीसाठी पैशाची गरज भासणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जाची अत्यंत आवश्यकता असते.

पीककर्ज देणाऱ्या बँका व अर्जप्रक्रिया

जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक यांच्याकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामात अल्पमुदतीत पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. पीककर्ज मिळवता-मिळवता शेतकऱ्यांच्या नाक्की नऊ येऊन जातात; यामागील कारणसुद्धा तसंच आहे, बँक कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांना द्यावी तशी योग्य माहिती दिली जात नाही, त्यामुळे पीककर्ज मिळवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना खूपच अवघड वाटते.

♦️ हे पण वाचा : नैसर्गिक शेतीसाठी हेक्टरी 27 हजार रु. अनुदान

या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, पीककर्ज कसं मिळवायचं ? पीक कर्जासाठी कोणती कागदपत्र लागतात ? पीककर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दलची थोडक्यात व सविस्तर माहिती.

शेतकरी मित्रांनो, पीककर्ज सामान्यतः तीन प्रकारामध्ये वितरित केलं जातं म्हणजे पीककर्जाची मर्यादा 1.6 लाखापर्यंत असेल, तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे 1.6 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे व तीन लाखापर्यंत पीककर्ज असेल, तर यासाठी वेगळी कागदपत्र लागतात.

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्र (Documents Required for Crop Loan)

पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र सामान्यता कर्ज मर्यादेनुसार कमी जास्त होत असतात. एक पॉईंट सात लाखापासून तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळी कागदपत्र जमा करून संबंधित बँकेमध्ये अर्ज करावा लागतो.

1.60 लाखापर्यंतच्या नवीन पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं

 • आधारकार्ड
 • 7/12 उतारा
 • 8 अ उतारा
 • जमिनीचा नकाशा
 • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • स्टॅम्प (कर्ज मर्यादानुसार 100 रु. 3 किंवा 4 स्टॅम्प)
 • इतर बँकेकडून कर्ज न घेतल्याचा दाखला

1.60 लाखापेक्षा जास्त पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं

1.60 लाखापेक्षा जास्त पीक कर्ज घेत असल्यास शेतकऱ्यांना वरील नमूद कागदपत्रा व्यतिरिक्त खालील कागदपत्र अर्ज करतेवेळी जोडून संबंधित बँकेत द्यावी लागतील.

 • नकाशा व जमिनीची चतुरसीमा
 • फेरफार नक्कल
 • बे-बाकी दाखला
 • ओलिताचं प्रमाणपत्र
 • कृषी उत्पन्नाचा दाखला
 • इतर बँकेचे कर्ज नसल्याबाबत दाखला

पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?

संबंधित शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पीककर्ज मिळवताना आपल्या गावातील दत्तक बँक किंवा तालुक्याला असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म म्हणजेच अर्ज भरावा लागेल. विहित नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्र संबंधित बँकेमध्ये जमा करावी लागतील.

जमा करण्यात आलेल्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल, जर शेतकरी पात्र असतील व सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर साधारणतः 7 ते 8 दिवसांमध्ये पीककर्ज मंजूर केलं जातं व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित केली जाते.

🌾 शेतकरी योजनायेथे क्लिक करा
🔔 सरकारी योजनायेथे क्लिक करा
🔰 शासन निर्णययेथे क्लिक करा
⚖️ रेशन न्यूजयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment