शासनाकडून बेरोजगारांना व्यवसायासाशी जोडण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी शासनाकडून सतत नवनवीन विविध योजना सुरू करण्यात येतात. याला अनुसरून एक पुढचं पाऊल म्हणून, आता केंद्रशासनाकडून लखपती दीदी योजना सुरू करण्यात येत आहे. याबद्दलची थोडक्यात व सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024
नुकताच देशामध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत भाषण करत असताना नव्या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली. ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना होय. सदर योजना काही राज्यांमध्ये आधीपासूनच म्हणजे 4 नोव्हेंबर 2022 पासून अस्तित्वात होती; परंतु आता केंद्रशासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी Lakhpati Didi Yojana सुरु करण्यात आली आहे.
खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत आपण जर पाहिलं, तर अगदी खेड्यातील अंगणवाड्यापासून शहरातील बँकेपर्यंत सर्वच क्षेत्रात महिला आग्र स्थानी काम करताना दिसून येतात, अशा महिलांना संबोधित पंतप्रधान म्हणाले की, गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांना दीदी या नावाने संबोधले जाते. अशा महिलांना शासन लखपती बनविण्याची योजना आखत आहे, याच योजनेला लखपती दीदी योजना असं नाव देण्यात आलं.
योजना नाव | Lakhpati Didi Yojana |
राज्य | मागील राज्य + नवीन राज्यांच्या समावेश |
उद्देश | महिलांना प्रशिक्षण देऊन लखपती बनविणे |
घोषणा | 15 ऑगस्ट 2023 |
विशेष लाभ | बचतगट महिला |
लाभार्थी वर्ग | अंगणवाडी सेविका, महिला, आरोग्य सेविका इत्यादी |
अर्ज प्रक्रिया | आँनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | लवकरच जाहीर करण्यात येईल |
लखपती दीदी योजना उद्देश
सदर योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बचतगटाशी सलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्यांच प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे हा होय. प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब निर्मिती, ड्रोन चालवणे विविध यंत्र दुरुस्ती अश्या प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, त्यामुळे महिला सक्षम व स्वावलंबी बनतील आणि हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
लखपती दीदी योजना कागदपत्रे (Documents)
- अर्जदार महिलांचा आधारकार्ड
- पॅनकार्ड झेरॉक्स
- बँकेचा पासबुक झेरॉक्स
- शैक्षणिक कागदपत्र
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Lakhpati Didi Yojana Eligibility (पात्रता)
- सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- बचतगटाच्या सदस्य असलेल्या महिलांचं या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदार महिलांच वार्षिक उत्पन्न कमी असाव.
- सदर योजनेत समाविष्ट झाल्यानंतर महिलांचे प्रशिक्षण घेण्याची तयारी असावी.
- अर्जदार महिला भारताच्या रहिवाशी असाव्यात.
महिलांना मिळणारा लाभ !
नावाप्रमाण या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देऊन लखपती बनवलं जाईल. महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल त्याचप्रमाणे विविध लघु उद्योगासाठी लागणारं मार्गदर्शन, प्रशिक्षण केलं जाईल.
How To Apply Online
देशातील सर्व स्वयंसहायता बचतगट सदस्य महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण अद्याप सदर योजनेची अर्ज प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेले नाही; परंतु नुकतीच या संदर्भातील घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे, ही योजना लवकरच सुरू करण्यात येईल, त्यानंतर आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देऊ. तद्नंतर तुम्ही लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करू शकाल आणि या योजनेचा लाभ मिळवू शकाल.
Conclusion
निष्कर्ष : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व प्रबळ बनविण्यासाठी शासनाकडुन सूरू करण्यात Lakhpati Didi Yojana एक महत्वकांक्षी योजना आहे. भारतातील काही राज्यामध्ये (उदा. उत्तराखंड) ही योजना सुरू असून लवकरच शासन सर्व राज्यात ही योजना सुरू करून याचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित करेल अशी आशा आपण बाळगू. 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा पुन्हा नव्याने करण्यात आली; परंतु याबद्दलची संपूर्ण माहिती अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाही. माहिती प्रसिध्द झाल्यानंतर आम्ही अवश्य त्यावरती संपूर्ण माहिती देऊ. आम्ही आशा करतो, आमच्याकडून देण्यात आलेली माहिती तुमच्या उपयोगी आली असेल आणि आवडली पण असेल, तर चला मग मित्रांना, परिवाराना नक्की शेअर करा !
लखपती दीदी योजना काय आहे ?
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व प्रबळ बनवण्यासाठी केंद्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना.
लखपती दीदी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
Lakhpati Didi Yojana सध्यास्थितीत उत्तराखंड व इतर राज्यासाठी लागू आहे; परंतु 15 ऑगस्ट 2023 दिवशी पंतप्रधान यांच्यामार्फत नव्याने घोषणा करण्यात आल्यानंतर यामध्ये नवीन राज्यांची भर पडू शकते.
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
सध्यास्थितीत यासंदर्भातील अधिकृत माहिती केंद्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
लखपती दीदी योजनेअंतर्गत काय लाभ देण्यात येईल ?
Lakhpati Didi Yojanaलखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना विशिष्ट कौशल्यअंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येईल व सोबतच आर्थिक सहाय्यसुध्दा करण्यात येईल.
• हे पण वाचा : 👇