Aapli Chawdi : गावातील जमीन खरेदी विक्रीची माहिती मोबाईलवर पहा

By Admin

Updated on:

Aapli Chawdi : गावात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर चालतात; परंतु काहीवेळा याची कल्पना संबंधिताला किंवा गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना माहिती नसते. हाच विचार करून गावात होत असलेला खरेदी-विक्रीचा व्यवहार नागरिकांना पाहता यावा, यासाठी शासनाकडून आपली चावडी (Aapli Chawdi) हा पोर्टल सुरू करण्यात आला.

आपली चावडी माहिती

आपली चावडी या शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या वेबसाईट/पोर्टलबद्दल सर्व नागरिकांना माहिती असावी. आपली चावडी पोर्टलच्या माध्यमातून गावातील नागरिकांना शेतजमीन खरेदी-विक्रीची संपूर्ण माहिती ऑनलाईन घरबसल्या आपल्या मोबाईलवरती पाहता येते. यामध्ये फेरफार, खरेदीखत, बोजा चढविणे-उतरविणे, विहीर नोंद इत्यादी बाबी पाहता येतात.

आपली चावडी म्हणजेच सध्याच्या युगातील डिजिटल नोटीस बोर्ड आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा जमिनीची खरेदी-विक्री होत असत, तेव्हा तलाठी यांच्यामार्फत 15 दिवसासाठी हरकत किंवा आक्षेप नोटीस ग्रामपंचायतला लावण्यात येत असतं. तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायतीला गेल्याशिवाय आपल्याला गावातील खरेदी-विक्रीची माहिती मिळत नसत. आता शासनाच्या Aapli Chavdi Digital Notice Board प्रकल्पामुळे सर्व माहिती घरबसल्या मोबाईलवर पाहता येत आहे.

पोर्टलआपली ई चावडी
विभागकृषी विभाग
उपयोगऑनलाईन शेतजमीन माहिती
वापरकर्ताशेतकरी, नागरिक
अधिकृत वेबसाईटAapli Chavdi

आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल ! आपल्या गावातील दुसऱ्या व्यक्तीच्या जमीन खरेदी-विक्रीची माहिती पाहून आपल्याला काय फायदा होणार ? मित्रांनो, बऱ्याच वेळी काय होतं एखाद्या शेतकऱ्यांचा जमिनीलगतच्या इतर शेतकऱ्यांसोबत कोणत्यातरी कारणावरून वाद सुरू असतो, या वादाला तोडगा म्हणून किंवा इतर काही कारणावरून विरुद्ध पार्टीतील शेतकरी किंवा व्यक्ती बाहेरील व्यक्तीला जमीन विकतो, यामुळे काय होतं त्याजमिनीसंदर्भात सुरू असलेले वाद कमी होण्याऐवजी अधिक वाढतात. नवीन जमीन खरेदीदारास अशा चालू असलेल्या वादाबाबत कल्पना नसते, त्यामुळे तो जमीन खरेदी करून बसतो.

आपली चावडीचे विविध फायदे

 • आपल्या गावातील तसेच आपल्या स्वतःच्या शेतजमिनीतील गटात होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहाराची अचूक व योग्य माहिती सहज व सोप्या पध्दतीने उपलब्ध होते.
 • आपली चावडी” वेबसाईटवर माहिती सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे, आपल्याला किंवा संबंधिताला एखाद्या आपली चावडी ई फेरफार किंवा आपली चावडी 7 12 वर आक्षेप घ्यावयाचा असल्यास लगेच घेता येतो आणि वेळीच नोंद थांबविता येते.
 • महाभूलेख आपली चावडीचा ॲपसुध्दा विकसित करण्यात आलेला असून आपली चावडी ॲप या नावाने तो प्ले-स्टोरवर पाहण्यास मिळेल.

Mahabhulekh Aapli Chawdi

महाभुलेख आपली चावडी पोर्टलवर नागरिकांना सहज व सोप्या पद्धतीने गावात सध्यास्थितीत होत असलेल्या फेरफार, महाभुलेख 7/12, कर्ज बोजा, वारस नोंद इत्यादी विविध बाबींचा तपशील पाहता येतो. यासाठी नागरिकांना पोर्टलवर जाऊन आपली चावडी पहा या पर्यायावर क्लिक करून सदरची माहिती पाहता येते.

आपली चावडी ॲप

नागरिकांना आपली चावडी सुविधेचा योग्य लाभ घेता यावा, यासाठी शासनाकडून नुकताच आपली चावडी अँड्रॉइड ॲपसुध्दा विकसित करण्यात आला आहे, त्यासाठी Play Store वर Mahabhulekh Aapli Chawdi असा कीवर्ड टाकून खालीलप्रमाणे दिसणारा ॲप इंस्टॉल करावा.

Aapli Chawdi Android App
Aapli Chawdi

आपली चावडी पोर्टलवर माहिती अशी पहा !

 • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Aapli Chawdi Bhumi Abhilekh ही वेबसाईट ओपन करा.
 • पोर्टल संपूर्णत: उघडल्यानंतर तुमच्यासमोर खालीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.
  1. सातबारा विषयी
  2. मालमत्ता पत्रक विषयी
  3. मोजणी विषयी
 • आपण गावातील शेतजमिनी संदर्भातील होणाऱ्या खरेदी-विक्री बद्दलची माहिती पाहणार आहोत, त्यामुळे सातबारा विषयी माहिती या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर अनुक्रमे तुमचा जिल्हा, तालुका, गाव इत्यादी निवडून घ्या, रखाण्यात देण्यात आलेला कोड टाकून आपली चावडी पहा, या बटणावर क्लिक करा.
 • काहीच वेळात तुमच्यासमोर तुमच्या गावातील जमिनीसंदर्भातील सध्यास्थितीत चालू असलेल्या व्यवहार, फेरफार, बोजा, खरेदीखत इत्यादींची संपूर्ण माहिती दिसेल.

निष्कर्ष : मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्यापद्धतीने फक्त 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती गावातील चालू असलेल्या विविध शेतजमिनीविषयक व्यवहाराबद्दल माहिती पाहू शकता. आम्ही आशा करतो, आमच्यामार्फत देण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा !!

आपली चावडी काय आहे ?

आपली चावडी शासनाचा एक अधिकृत पोर्टल असून याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावात होत असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री संदर्भात माहिती मिळते.

आपली चावडी पोर्टल कोणत्या राज्यासाठी उपलब्ध आहे ?

आपली ई चावडी फक्त महाराष्ट्र राज्यासाठी उपलब्ध आहे.

आपली चावडी पोर्टल कोणाकडून राबविण्यात येत ?

आपली चावडी पोर्टल राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत येणाऱ्या महाभूमी अभिलेख विभागाकडून राबविण्यात येत.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment