शेतकरी मित्रांनो, दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा ई पीक पाहणीला (E Peek Pahani) सुरुवात झालेली आहे. राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप 2024 च्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. 1 जुलै 2024 पासून शेतकरी खरीप ई पीक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन अँड्रॉइड एप्लीकेशन अपडेट करण्यात आलेलं आहे.
E Peek Pahani 2024 | ई पीक पाहणी 2024
शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी आता कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलवर शेतकरी सहज व सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंद करू शकतात. शेतकऱ्यांना खरीप 2024 ई पीक पाहणी करण्यासाठी प्ले-स्टोअरवरून जुना एप्लीकेशन अपडेट करून घ्यावा लागेल किंवा त्याऐवजी जुना एप्लीकेशन काढून टाकून नवीन ई-पीक पाहणी अँड्रॉइड एप्लीकेशन (e Peek pahani app) इन्स्टॉल करावा लागेल.
ई-पीक पाहणी नवीन ॲप | येथे क्लिक करून डाऊनलोड करा |
15 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणीची मोहीम सुरू करण्यात आली. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते. राज्यामध्ये सध्यास्थितीला 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्यांची नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे दिवसेंदिवस ई-पीक पाहणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
प्रकल्प संपूर्ण नाव | ई पीक पाहणी |
राबविणार राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी वर्ग | राज्यातील शेतकरी |
उद्देश | पिकांच नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावा |
नोंदणी पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत ॲप | E Peek Pahani App |
ई-पीक पाहणी नवीन सुविधा
- Geo Fencing सुविधा
- शेतकरी ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता
- किमान 10% तपासणी तलाठ्यांमार्फत
- 48 तासात ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
- किमान आधारभूत किंमत नोंदणी सुविधा
- मिश्र पिकांमध्ये इतर 3 मुख्य पीक नोंदविण्याची सुविधा
- संपूर्ण गावाची ई पीक पाहणी बघण्याची सुविधा
- ॲपबाबत अभिप्राय रेटिंगची सुविधा
- खाता अपडेट करण्याची सुविधा
ई-पीक पाहणी डाउनलोड करा
मित्रानो, तुम्हाला तुमच्या पिकांची खरीप किंवा रब्बी ई-पीक पाहणी करावयाची असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम e peek pahani app डाउनलोड करावा लागेल. त्यासाठी Playstore वर जाऊन तुम्ही ई पीक पाहणी हा कीवर्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल, इन्स्टॉल या बटणवर क्लिक करून तुम्ही ई-पीक पाहणीचा नवीन Version 3.0.2 डाऊनलोड अथवा इन्स्टॉल करा.
📣 तुमची ई पीक पाहणी यशस्वीरित्या झाली का नाही ? अशी चेक करा मोबाईलवर
ई-पीक पाहणी लिस्ट
शेतकरी मित्रांनो, तुमच्या संबंधित गावातील ई पीक पाहणीची यादी (List) पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ई पीक पाहणी अँप इन्स्टॉल असणं महत्त्वाचं आहे. ई-पीक पाहणी ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसतील. ई पीक पाहणी लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला शेवटचा पर्याय ‘गावाचे खातेदारांची पीक पाहणी’ या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर संबंधित गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची यादी दिसेल. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली असेल, त्यांचं नाव व ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली नसेल, त्यांचसुद्धा नाव दाखवलं जाईल.
E Pik Pahani Last Date 2023
अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची शेवटची तारीख तोंडावर आलेली असतानासुद्धा पिकाची नोंद केलेली नाही, त्यामुळे महसूल विभागाकडून पूर्वीची ई-पीक पाहणीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 ऐवजी, आता मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना 1 महिना 15 दिवसाचा वाढीव कालावधी दिला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्या पिकाची ऑनलाईन नोंद करता येणार आहे.
E Peek Pahani Online Maharashtra
शेतकरी बांधवांना, आपल्या शेतातील पिकांची, फळ झाडांची, पडीक जमिनीची, विहीर अथवा बोरवेलची नोंद आपल्या मोबाईल वरती करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. ई पीक पाहणी ऑनलाईन नोंद (Registration) करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सुशिक्षित शेतकरी फक्त 5 मिनिटाच्या आत ई-पीक पाहणी मोबाईलवरून करू शकतात. जर तुम्हाला ही पिक पाणी करता येत नसेल, तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहूनसुद्धा खरीप ई-पीक पाहणी करू शकता.
- मोबाईलवर ई-पीक पाहणी कशी करावी ?
- ई-पीक पाहणी करताना पडीक जमीन नोंद कशी करावी?
- ई-पीक पाहणी विहीर बोर नोंद कशी करावी ?
- ई पीक पाहणी नोंदणी 2023
- ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड
ई पीक पाहणी कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
ई पीक पाहणी फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
ई पीक पाहणी म्हणजे काय ?
ई पीक पाहणी हा एक सर्वेक्षण ॲप असून याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करता येते. शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी प्रकल्प शासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे.
ई पीक पाहणी नवीन ॲप कोठून डाऊनलोड करता येईल ?
शेतकऱ्यांना नवीन ई पीक पाहणी ॲप प्ले-स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे