ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झाली का नाही ? असं चेक करा मोबाईलवर | How to Check e pik Pahani Status Online

By Admin

Updated on:

e pik pahani status : आपल्या शेतामध्ये पेरण्यात आलेल्या पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली. नियमानुसार एखाद्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलीच नाही, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जमीन पडीक ग्राह्य धरली जाईल म्हणजेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारच पीक चालू वर्षांमध्ये घेण्यात आलेलं नाही असं समजण्यात येईल.

ई-पीक पाहणी या कारणांसाठी आवश्यक

शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणार शासकीय अनुदान, पिक विमा, खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक कर्ज अशा विविध बाबींसाठी लाभ मिळवायचा असेल, तर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे; अन्यथा शेतकरी सदर योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन दरवर्षी शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येतं.

मागील काही दिवसापूर्वी राज्यातील कांद्याचा दर घसरल्यामुळे शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान योजना सुरू करण्यात आली होती, ज्याअंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 300 रु. अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु यामध्ये एक प्रमुख अट ठेवण्यात आलेली होती, ती म्हणजे सातबाऱ्यावरती कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक होते, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी पात्र असून देखील, ई-पीक पाहणी न केल्यामुळे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे ई-पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

e Pik Pahani Compulsory

नुकसान भरपाई, पिक विमा, खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक कर्ज अशा विविध बाबींसाठी आपल्या शेतातील पिकांची नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी न चुकता आपली ई-पीक पाहणी करावी. आता बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की ? ई-पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर ई पीक पाहणी स्टेटस कसं आणि कुठ पाहावं ?

नुकसान भरपाई, पिक विमा व इतर शेती सलग्न योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहणीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे.

Check e Pik Pahani Status

  • सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून ई-पीक पाहणी ॲप इन्स्टॉल/डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • यानंतर खालील स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे “गावच्या खातेदारांची पीक पाहणी” या पर्यायावर क्लिक करा.

  • तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी खालीलप्रमाणे तुमच्यासमोर दिसेल, ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली असेल आणि माहिती यशस्वीरित्या सबमिट झाली असेल, अशा शेतकऱ्यांच नाव हिरव्या कलरने दर्शविल जाईल.

  • यासोबतच ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अद्याप झाली नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांची यादी पांढऱ्या रखान्यात दर्शविण्यात येईल.

📌 महत्त्वाची सूचना : ही बाब लक्षात असू द्या आपण ई-पीक पाहणी करून कमीत कमी 48 तास झाल्यानंतरच आपलं नाव ई पीक पाहणीच्या लिस्टमध्ये जोडलं जाईल. 48 तासाचा कालावधी किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा ई पीक पाहणी यादीत नाव आलं नसेल, तर आपली ई पीक पाहणी यशस्वीरित्या पार पडली नाही असं समजावं.

ई-पीक पाहणी कशी करावी ?

ई-पीक पाहणी कशी करावी, या संदर्भात आम्ही आमच्या वेबसाईटवर पूर्वीच लेख लिहिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता अन्यथा लेखामध्ये देण्यात आलेला व्हिडिओ पाहूनसुद्धा ई-पीक पाहणी करू शकता.

ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झाली का नाही, कसं पाहावं ?

या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी तुम्ही वरील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावा.

ई-पीक पाहणी न केल्यास काय होणार ?

ई-पीक पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन पडीक आहे असं समजलं जाईल आणि संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही शेतीशी निगडित शासकीय अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment