महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी व पशुपालकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते, ती म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होय. या योजनेच्या माध्यमातून पशुपालक, महिला, शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना शेळी, गाय, म्हैस इत्यादी अनुदानतत्वावर दिले जातात.
शेळी गट वाटप योजना महाराष्ट्र 2023
जि.प उपकर योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत विधवा महिलांना व दिव्यांगाच्या कुटुंबाला 100 टक्के अनुदानावर 02 शेळीगट वाटप (Goat Farming Subsidy) केलं जाणार आहे. सदरची योजना 2 विविध लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असल्यामुळे याबद्दलची माहिती पाहूयात.
🔴 भाऊ हे पण वाचा : शेतीसाठी तार कंपाउंड (कुंपण) योजना सुरू; इतकं मिळणार अनुदान
योजना क्र. 01 : नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विधवा महिलांना 02 शेळ्या वाटप करण्यात येतील. ज्यामध्ये शेळी किंमत 16,000/- रु. व तीन वर्षाचा पशुविमा 1,012 रु. असा एकंदरीत 17,012 रु. लाभ सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल. प्रत्येकी विधवा महिलेस 02 उस्मानाबादी शेळ्याचे वाटप करण्यात येईल.
योजना क्र. 02 : नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत दिव्यांगाच्या कुटुंबाला शंभर टक्के अनुदानावर 02 शेळ्या वाटप करण्यात येतील. ज्यामध्ये शेळी किंमत 16,000/- रु. व तीन वर्षाचा पशुविमा 1,012 रु. असा एकंदरीत 17,012 रु. लाभ सर्व प्रवर्गातील दिव्यांगाना देण्यात येईल. प्रत्येकी 02 उस्मानाबादी शेळ्याचे वाटप करण्यात येईल.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र
- अर्जदारांना आधारकार्ड (Aadhar Card)
- बँक पासबुक झेरॉक्स
- रेशनकार्ड झेरॉक्स (Ration Card)
- शेतीचा 7/12 उतारा
- 8अ उतारा
- दिव्यांग प्रमाण (आवश्यक)
- मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक)
- दारिद्य्ररेषेखाली मोडत असल्याचा दाखला
अर्ज कुठे करावा ?
सदरील योजना ही पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांची आहे. त्यामुळे संबंधित अर्जदारांनी या विभागाकडे शेळी गट वाटप योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव दाखल करावा.
विहित नमुन्यातील अर्ज खालीलप्रमाणे डाऊनलोड करून आवश्यक कागदपत्रासह संबंधित विभागाकडे सादर करा.
अनुक्रमांक | योजना नाव/प्रकार | फॉर्म लिंक |
01 | नाविन्यपूर्ण योजना विधवा महिलांसाठी 100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप | येथे डाऊनलोड करा |
02 | नाविन्यपूर्ण योजना दिव्यांग कुटुंबातील व्यक्तींना 100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप | येथे डाऊनलोड करा |