शेळी गट वाटप योजना 100% अनुदानावर अर्ज सुरू; फक्त या जिल्ह्यासाठी : Sheli Gat Vatap Yojana Maharashtra 2023

By Admin

Published on:

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी व पशुपालकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते, ती म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होय. या योजनेच्या माध्यमातून पशुपालक, महिला, शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना शेळी, गाय, म्हैस इत्यादी अनुदानतत्वावर दिले जातात.

शेळी गट वाटप योजना महाराष्ट्र 2023

जि.प उपकर योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत विधवा महिलांना व दिव्यांगाच्या कुटुंबाला 100 टक्के अनुदानावर 02 शेळीगट वाटप (Goat Farming Subsidy) केलं जाणार आहे. सदरची योजना 2 विविध लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असल्यामुळे याबद्दलची माहिती पाहूयात.

🔴 भाऊ हे पण वाचा : शेतीसाठी तार कंपाउंड (कुंपण) योजना सुरू; इतकं मिळणार अनुदान

योजना क्र. 01 : नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विधवा महिलांना 02 शेळ्या वाटप करण्यात येतील. ज्यामध्ये शेळी किंमत 16,000/- रु. व तीन वर्षाचा पशुविमा 1,012 रु. असा एकंदरीत 17,012 रु. लाभ सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल. प्रत्येकी विधवा महिलेस 02 उस्मानाबादी शेळ्याचे वाटप करण्यात येईल.

योजना क्र. 02 : नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत दिव्यांगाच्या कुटुंबाला शंभर टक्के अनुदानावर 02 शेळ्या वाटप करण्यात येतील. ज्यामध्ये शेळी किंमत 16,000/- रु. व तीन वर्षाचा पशुविमा 1,012 रु. असा एकंदरीत 17,012 रु. लाभ सर्व प्रवर्गातील दिव्यांगाना देण्यात येईल. प्रत्येकी 02 उस्मानाबादी शेळ्याचे वाटप करण्यात येईल.

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

  • अर्जदारांना आधारकार्ड (Aadhar Card)
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • रेशनकार्ड झेरॉक्स (Ration Card)
  • शेतीचा 7/12 उतारा
  • 8अ उतारा
  • दिव्यांग प्रमाण (आवश्यक)
  • मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक)
  • दारिद्य्ररेषेखाली मोडत असल्याचा दाखला

अर्ज कुठे करावा ?

सदरील योजना ही पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांची आहे. त्यामुळे संबंधित अर्जदारांनी या विभागाकडे शेळी गट वाटप योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव दाखल करावा.

विहित नमुन्यातील अर्ज खालीलप्रमाणे डाऊनलोड करून आवश्यक कागदपत्रासह संबंधित विभागाकडे सादर करा.

अनुक्रमांकयोजना नाव/प्रकारफॉर्म लिंक
01नाविन्यपूर्ण योजना विधवा महिलांसाठी 100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटपयेथे डाऊनलोड करा
02नाविन्यपूर्ण योजना दिव्यांग कुटुंबातील व्यक्तींना 100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटपयेथे डाऊनलोड करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment