राज्य शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना इत्यादी घरकुल योजनांचा समावेश आहे. यामधील धनगर समाजासाठी घरकुल उपलब्ध करून देणारी आणखी एक योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
या लेखात आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना काय आहे ? योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणती ? यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अटी शर्ती व पात्रता काय असतील ? यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सुविधा आहे का ? इत्यादी सर्व माहिती पाहणार आहोत.
🔴 हे पण वाचा : सावित्रीबाई फुले घरकुल योजना; OBC समाजासाठी घरकुल
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांचा विकास होऊन, त्यांचे राहणीमान उंचावे, आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने त्यांना जमीन उपलब्ध करून देऊन, त्याठिकाणी वसाहत उभी करण्यासाठी राज्य शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली.
मुक्त वसाहत योजना म्हणजेच यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या माध्यमातून भटक्या, विमुक्त जाती-जमातीच्या कुटुंबांना हक्काचं घर मिळवून दिलं जातं. या योजनेअंतर्गत खेडेगावातील भागामध्ये वीस कुटुंबासाठी एक वस्ती तयार केली जाते. यासाठी पाणीपुरवठा, वीज,पुरवठा, सेप्टिक टँक, रस्ते अशा प्रकारच्या विविध सुविधा त्या वस्तीला पुरविल्या जातात.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासन निर्णय (GR)
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत नवनवीन नियमावली व सूचना संदर्भात शासनाकडून वेळोवेळी शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेले आहेत. संबंधित शासन निर्णयात कोणत्या नागरिकांना लाभ देण्यात येईल ? यासाठीची पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना संदर्भात शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची यादी खालील रखाण्यात देण्यात आलेली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अर्ज pdf
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना किंवा घरकुल योजना संपूर्णता ऑफलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे अर्जदारांना संबंधित जिल्ह्यातील पंचायत समितीकडून घरकुल योजनेचा फॉर्म घेऊन मा.गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे संपूर्ण माहितीसह व आवश्यक कागदपत्रासह अर्ज जमा करावयाचा आहे. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी अर्ज pdf म्हणजेच form pdf खालील रखान्यात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी कुटुंबांना खालीलप्रमाणे प्राधान्य
या योजनेअंतर्गत सामान्यतः पालात राहणाऱ्यांना, गावोगावी भटकंती करून उपजीविका करणाऱ्याला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला त्याचप्रमाणे घरात कोणीही कामावर नाही, अशा विधवा परित्यकत्या किंवा अपंग महिला पूरग्रस्त क्षेत्र बाधित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल.
घटकुलासाठी किती पैसे मिळतात ?
- घरकुलसाठी निवड झालेल्या लाभार्थी अर्जदारांना या योजनेअंतर्गत कुटुंबास प्रत्येकी 5 गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फूटचे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
- लाभार्थ्यांना देण्यात आलेली जमीन कोणालाही विकता येणार नाही किंवा भाडेतत्त्वावर देता येणार नाही.
- प्रत्येक वर्षी राज्यातील 34 जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावांची निवड करून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अटी
- अर्जदार कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदाराकडे स्वतःच्या मालकी हक्काच घर नसावं.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार सध्या स्थितीमध्ये कच्च्या घरात किंवा झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
- अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबामार्फत यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा राज्य शासनाकडून लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी कुटुंब भूमिहीन म्हणजेच बिगर जमीनधारक असावेत.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच पात्र व्यक्तीस मिळेल.
- यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही फक्त राज्यातील ग्रामीण भागासाठीच लागू आहे.
- लाभार्थी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी वास्तव्यास असावा.
- दहा पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
- 20 कुटुंबासाठी एक हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्यास सदर योजनेच्या नियमांमध्ये किंवा अटीमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार तालुका स्तरावरील समितीस आहे.
- अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्जदार वैयक्तिक लाभ मिळवू शकतात.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना कागदपत्रे (Documents)
- सक्षम प्राधिकारी यांच्याकडून देण्यात आलेला जातीचा दाखला
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला (1 लाखापेक्षा कमी)
- भूमिहीन असल्याबाबत प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असल्याचा पुरावा
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अर्ज कुठे करावा ?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून राबविली जात असल्यामुळे, लाभार्थ्यांना Online Application करता येणार नाही; मात्र पात्र लाभार्थी अर्जदारांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाला भेट द्यावी लागेल. योजनेसंदर्भातील अधिक चौकशी करून Yashwantrao Chavhan Gharkul Yojana Form भरुन समाजकल्याण कार्यालयामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करावा लागेल.
अधिक माहितीसाठी PDF | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |
पीएम मोदी आवास योजना | येथे क्लिक करा |
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कोणत्या समाजासाठी आहे ?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अनुसूचित जाती-जमाती या समाजातील नागरिकांसाठी आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का ?
नाही, ही योजना संपूर्णता सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येत असल्यामुळे अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं ?
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी 1.30 लाख रु. तर सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी 1.20 लाख रु. इतक अनुदान देय आहे.