राज्य शासनामार्फत विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, VJNT साठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजना विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येतात.
सावित्रीबाई फुले घरकुल योजना (OBC Gharkul Yojana)
29 जुन 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले घरकुल योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात येत आहे.
अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती या प्रवर्गातील गरीब व इतर मागासवर्गीय नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्याचा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारच्या विचाराधीन आहे.
📣 हे सुध्दा वाचा : घरकुल योजनेत मोठा बदल ! सर्वांना घरकुल मिळणार
ओबीसी समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या या घरकुल योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले जाणारे असून योजनेचा स्वरूप निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना आता नव्या पद्धतीने राबवली जात असून शासनामार्फत तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.
घरकुल निधी व जागा दोन्ही मिळणार
या योजनेच्या माध्यमातून आता घर बांधणीसाठी घरकुल निधी त्याचप्रमाणे जमीनसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ज्या नागरिकांना घरकुल मंजूर होत होता; परंतु त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नव्हती त्यांना नक्की फायदा होणार आहे.
या योजनेमधील एक अमुलाग्र बदल म्हणजे या योजनेत आता एका नवीन प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. तो प्रवर्ग म्हणजे ओबीसी. आता ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना सुद्धा Savitribai Phule Gharkul योजनेचा लाभ मिळणार आहे, यासाठी ओबीसी समाजासाठीच्या योजनेवरती अभ्यास करून लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
Savitribai Phule Gharkul Yojana अनुदान किती ?
राज्य सरकारकडून घर बांधकामासाठी सावित्रीबाई फुले घरकुल (Savitribai Phule Gharkul Yojana) योजनेअंतर्गत क्षेत्रनिहाय खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थ्यां निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील नेमण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येईल.
सपाट भागासाठी | 1 लाख 20 हजार रु. |
डोंगरी भागासाठी | 1 लाख 30 हजार रु. |
वरील नमूद अनुदाना व्यतिरिक्त अधिक रक्कम खर्च करून लाभार्थी घर बांधकाम करू शकतात. योजनेमध्ये २६९ चौरस फुटाचे घर दिले जात. VJNT लाभार्थ्यांसाठी सरकारकडून जागा देण्याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये या योजनेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली होती; परंतु या योजनेचा योग्य निर्णय त्यावेळी होऊ शकला नव्हता. त्यामुळे परत या योजनेतील उणीवा कमी करून नवीन प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल अशी माहिती ओबीसी विभागाची मंत्री अतुल सावे यांच्यामार्फत देण्यात आले.
Savitribai Phule Gharkul Yojana
सावित्रीबाई फुले घरकुल योजनेसाठी किती अनुदान मिळणार ?
या योजनेसाठी क्षेत्रफळनिहाय अनुदान देण्यात येईल, ज्यामधील अनुदान मर्यादा 1.30 लाखापर्यंत असेल.
सावित्रीबाई फुले घरकुल योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे ?
ही योजना अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीसाठी आहे; पण सध्या ही योजना आता ओबीसी (OBC) प्रवर्गासाठीसुध्दा राबविण्यात येणार आहे.