पीएम मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट, अर्ज Pdf : Modi Awas Yojana obc 2023

By Admin

Published on:

राज्य व केंद्रशासनाकडून नागरिकांना घर बांधण्यासाठी विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. आता नव्यान ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसी (obc) वर्गातील नागरिकांना हक्काचं घर देण्यासाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेला मोदी आवास घरकुल योजना, पीएम मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना या विविध नावान ओळखल जात आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण मोदी आवास योजना काय आहे ? याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

पीएम मोदी आवास योजना

प्रधानमंत्री मोदी आवास योजनेअंतर्गत इतर आणि विशेष मागास प्रवर्गाला घरकुल देण्यात येणार असून ज्या लाभार्थ्याकडे राहण्यासाठी जागा उपलब्ध नसेल, अश्या लाभार्थ्यांना जागेसाठी देखील अनुदान देण्यात येणार आहे. ओबीसी कल्याण विभागाकडून बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी मोदी आवास योजनेची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली.

ओबीसी कल्याण विभागाकडून नरेंद्र मोदी आवास योजना इतर मागास प्रवर्गातील जातीसाठी आखलेली होती; परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरची योजना इतर मागासवर्गीयाबरोबरच विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीसुध्दा राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी योजनेत बदल करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

योजना संपूर्ण नावमोदी आवास योजना महाराष्ट्र
सुरू करणार राज्यमहाराष्ट्र
संबंधित विभागओबीसी कल्याण विभाग
लाभार्थी कोणओबीसी + एसबीसी प्रवर्गातील
लाभ स्वरूपघरकुल अनुदान
अधिकृत वेबसाईटलवकरच सुरू..

मोदी आवास योजना शासन निर्णय (GR)

पीएम मोदी आवास योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण जी.आर 27 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. इतर व विशेष मागास प्रवर्गातील घरकुलासाठी पात्र असलेल्या कुटुंबांना घरकुल अनुदान देण्यासाठी नियम व अटी जुन्याच असणार आहेत, ज्या 28 जुलै 2023 रोजी देण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत. बहुजन कल्याण विभागाकडून 28 जुलै 2023 रोजी मोदी आवास योजना संदर्भातील शासन निर्णय काढण्यात आलेला होता. ज्यामध्ये सदर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

इतर विविध घरकुल योजना

आवास प्लस अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकला नाही, अश्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने खालील योजना सुरू आहेत.

  • रमाई आवास योजना
  • शबरी आवास योजना
  • आदिम आवास योजना
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
  • धनगर आवास योजना

लाभार्थी कोण ?

मोदी आवास घरकुल योजनेसाठी तब्बल 12 कोटी रु. इतका खर्च करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना पंतप्रधान घरकुल योजनाचा लाभ मिळू शकला नाही किंवा ज्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलं आहे, अश्या ओबीसी, एसबीसी (obc-sbc) समाजातील नागरिकांना या नव्या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव देण्यात आलं आहे.

Modi Awas Yojana Eligibility

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिक असावा.
  • महाराष्ट्र राज्यात कमीत कमी 15 वर्ष वास्तव असणे आवश्यक.
  • लाभार्थी वार्षिक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा जास्त नसावं.
  • लाभार्थ्याला स्वतःच्या अथवा कुटुंबाच्या मालकी जागेत पक्क घर नसाव.
  • लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाकडून देण्यात आलेली जमीन असावी, अन्यथा स्वतःच कच घर असल्यास बांधकाम करता येईल.
  • लाभार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण किंवा गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • मोदी आवास योजनेचा एकदा लाभ घेतल्यानंतर तोच लाभार्थी पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • लाभार्थी कायमस्वरूपी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत समाविष्ट असावा.

Modi Awas Yojana अनुदान रक्कम

Modi आवास योजनेअंतर्गत येत्या 3 वर्षात जवळपास 10 लाख घर बांधली जातील. या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा विचार केला तर, डोंगरी भागासाठी 1.30 लाख रु. तर अन्य भागासाठी 1.20 लाख रु. इतक अनुदान घर बांधण्यासाठी देण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना; जाणून घ्या या घरकुल योजनेची संपूर्ण माहिती

घर बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासोबतच, जर एखादा नागरिकांकडे जागा उपलब्ध नसेल, तर अशा परिस्थितीत घरासाठी जागा नसलेल्या दहा-दहा जणांचा गट करून त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेच्या माध्यमातून शासकीय जमीन देण्यात येईल. जमीन उपलब्ध नसेल, तर 500 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांचा अतिरिक्त अनुदान संबंधित लाभार्थ्याला देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे (documents)

  • सातबारा उतारा
  • मालमत्ता नोंदपत्रक
  • लाभार्थी बचत खाता पासबुक झेरॉक्स
  • आधारकार्ड, मतदान कार्ड
  • मनरेगा जॉब कार्ड, रेशन कार्ड
  • ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
  • जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत

आवास प्लस प्रणाली अंतर्गत निवड

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात रहिवास करत असणाऱ्या इतर व विशेष मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यात शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

  • आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेली लाभार्थी
  • आवास प्लस प्रणालीवर नोंद असलेले लाभार्थी; परंतु automatic system द्वारे नाकारण्यात आलेले पात्र लाभार्थी
  • जिल्हा निवड समितीकडून शिफारस करण्यात आलेले लाभार्थी

मोदी आवास योजना काय आहे ?

PM मोदी आवास योजना राज्यशासनाकडून सुरू करण्यात आलेली नवीन विशेष व इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठीची घरकुल योजना आहे.

मोदी आवास योजनासाठी लाभार्थी कोण ?

इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थी वस्तू या योजनेसाठी पात्र असतील.

मोदी आवास योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

प्रधानमंत्री मोदी आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना ग्रामसभेत सहभाग घ्यावा लागेल. ग्रामसभेमार्फत पात्र नगर त्यांचे निवड करण्यात येईल. लाभार्थी निवड कशी असेल ? यासाठी वरील माहिती नक्की वाचा.

मोदी आवास योजनासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?

यासंदर्भात सविस्तर माहिती लेखामध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे वरील लेख नक्की वाचावा.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment