Government Scheme : केंद्र आणि राज्यशासनाकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजनांमध्ये महिलांना मिरची कांडप मशीन, शिलाई मशीन, पिठाची गिरणी इत्यादी यंत्र मोफत वाटप केले जातात.
मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र 2023 (Free Flour Mill Scheme Maharashtra)
ग्रामीण भागातील महिलांना छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, या अनुषंगाने मोफत पिठाची गिरणी देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यामार्फत राबविला जात आहे.
♦️ हे पण वाचा : विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट मिळणार; जाणून घ्या अधिक माहिती !
शंभर टक्के अनुदानावर (Subsidy) पिठाची गिरणी देण्याचे योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ? यासाठीची पात्रता काय असेल ? अटी व शर्ती काय असतील ? अर्ज कसा करावा या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
🛑 महत्त्वाची सूचना : सदर योजना फक्त अनुसूचित जाती, आदिवासी इत्यादीसाठीच लागू असून सद्यस्थितीमध्ये फक्त पुणे जिल्ह्यासाठी ही योजना (Scheme) सुरू आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या संबंधित पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे चौकशी करावी.
मोफत पिठाची गिरणी पात्रता
- या योजनेचा लाभ फक्त महिलांना देण्यात येईल.
- महिलांना किंवा मुलींना या योजनेत सहभाग घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 अनिवार्य असेल.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांनाच मोफत पिठाच्या गिरणीचं वाटप करण्यात येईल.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रु. पेक्षा जास्त नसावी.
- जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात अर्जदारांनी घेतलेला नसावा.
- महिला लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड (Aadhaar Card)
- शैक्षणिक कागदपत्रं
- उत्पन्न दाखला (Income Certificate)
- आधार सलग्न बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook)
- विहित नमुन्यातील अर्ज
- रहिवाशी दाखला
- शिधापत्रिका झेरॉक्स (Ration Card)
- लाईट बिल
- व्यवसायासाठी निवडत असलेल्या जागेचा 8अ उतारा (Business Property)
मोफत पिठाच्या गिरणीसाठी अर्ज कसा करावा ?
मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिला अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जासाठी विहित नमुन्यातील अर्ज नमुना खाली देण्यात आलेला आहे. तू अर्जाचा नमुना प्रिंट काढून संपूर्ण व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून तुमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज दाखल करायचा आहे.
पिठाच्या गिरणीसाठी PDF अर्ज डाउनलोड करा | येथे क्लिक करा |
विविध योजनांची माहिती पहा | येथे क्लिक करा |