दहावीच्या विद्यार्थ्यांना NEET, CET प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज : Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023

By Admin

Published on:

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था मोफत प्रशिक्षणाची सुविधा देतात. ज्यामध्ये महाज्योती, बार्टी, सारथी इत्यादी संस्थांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’ यांच्यामार्फत महाज्योती फ्री टॅबलेट योजना राबविली जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय (Medical) व अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशाकरिता तयारी करत असतात. अशा विद्यार्थ्यांना मोफत नीट (NEET), सीईटी (CET) परीक्षांच प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योती संस्था दरवर्षी करते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोफत मोफत प्रशिक्षण सुरू झाल आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर Online अर्ज करावा लागेल.

♦️ हे सुध्दा वाचा : रेशन धान्यऐवजी आता मिळणार वार्षिक 9,000 रु.

2025 मध्ये होणाऱ्या NEET, CET परीक्षांची तयारी करण्यासाठी महाज्योती संस्थाकडून विद्यार्थ्यांना 18 महिन्यांकरिता मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत एक मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिला जातो. ज्यामध्ये 6 जीबी इंटरनेट डेटा अभ्यासासाठी मोफत दिला जातो.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्र, पात्रता, अटी व शर्तीच्या आधीन राहून ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.

योजना संपूर्ण नावMahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023
विभागशिक्षण विभाग : महाज्योती प्रशिक्षण संस्था
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील पात्र विद्यार्थी
लाभ स्वरूपमोफत प्रशिक्षण + टॅबलेट
अर्जाची पद्धतऑनलाईन

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 पात्रता

 1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 2. अर्जदार विद्यार्थी इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती, जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील असावा.
 3. विद्यार्थी नियमित 11वी व 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असावा.
 4. जे विद्यार्थी यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा मागील वर्षी दिली असेल, असे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

 • विद्यार्थ्यांचा आधारकार्ड
 • जातीचा दाखला
 • रहिवाशी दाखला
 • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
 • दहावीच्या परीक्षेचा हॉलतिकीट
 • नववीची गुणपत्रिका
 • विद्यार्थी 10वी पास असल्यास दहावीची गुणपत्रिका
 • 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा

फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन ( Online Registration)

महाज्योती मार्फतच्या NEET, CET मोफत प्रशिक्षणासाठी, फ्री टॅबलेट मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

फ्री टॅबलेट योजना Online Application Process

 1. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटची लिंक, कागदपत्रं अपलोड लिंक खालील रखाण्यामध्ये देण्यात आली आहे.
 2. वेबसाईटवर आल्यानंतर Notice Board या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर Application For NEET/JEE/CET Training या पर्यायावर क्लिक करायच आहे.
 3. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी तुम्हाला Click here for Registration या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
 4. त्यानंतर विद्यार्थ्यांची सविस्तर संपूर्ण माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे खाली देण्यात आलेल्या लिंकवरती क्लिक करून अपलोड करायची आहेत.
जाहिरात क्र. 01येथे क्लिक करा
जाहिरात क्र. 02येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे करायेथे क्लिक करा

महाज्योतीमार्फत मोफत टॅबलेट कसा मिळवता येईल ?

यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

मोफत टॅबलेटमध्ये काय प्रशिक्षण देण्यात येईल ?

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मोफत टॅबलेटमध्ये NEET/JEE/CET इत्यादींच प्रशिक्षण दिलं जाईल.

महाज्योती मोफत टॅबलेट योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

महाज्योती मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागु आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment