नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana

By Admin

Published on:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बजेटमध्ये एक अमुलाग्र असा बदल करून मोठा दिलासा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

यामध्ये नवीन योजनेची भर टाकून राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता वार्षिक केंद्र सरकारकडून 6,000 रु. व राज्य सरकारकडून 6,000 रु. अशी एकत्रित 12,000 रु. रक्कम मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जायचे; परंतु आता या नवीन योजना मुळे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नियमावली, GR अद्याप नाही

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये सादर करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेबद्दलची कोणतीही नियमावली, GR अथवा ही तर कोणतीही माहिती निर्गमित करण्यात आलेले नाही. यासंदर्भातील सविस्तर माहिती जशाप्रकारे अर्जाची प्रक्रिया, पात्र लाभार्थी, नियम व अटी याबद्दलची संपूर्ण माहिती शासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.

1.15 कोटी शेतकऱ्यांना लाभ

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana मुळे राज्यातील जवळपास 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी शासनाच्या तिजोरीवर जवळपास 6,900 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. आता केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणार.

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana

लाभार्थी शेतकरी कोण ?

सामान्यता या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल. अशी माहिती देण्यात आलेली आहे.

♦️ हे पण वाचा : गुढीपाडवा दिवाळी रेशन धान्य बोनस; १०० रुपयांत इतक्या वस्तू मिळणार

परंतु अद्याप या संदर्भातील शासन निर्णय किंवा नियमावली प्रसिद्ध झालेली नाही, त्यामुळे नेमकी कोणती शेतकरी पात्र असतील याबद्दलची माहिती शासनाचा अधिकृत अपडेट आल्यानंतर समजेल.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana


नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल का ?

अद्याप या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही; परंतु PM किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाईल.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल ?

जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासूनच लाभ घेत असतील अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR (शासन निर्णय) आला आहे का ?

अद्याप शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR (शासन निर्णय) आलेला नाही.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

4 thoughts on “नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana”

  1. Gets money with pm then what happens not get only give its all joke made by state government Frist deposits the n make pomadingya
    Regards
    Sgarib shetkari

    Reply
    • We are completely agree with your opinion sir, but government has some limitations and rules regulations so each and every scheme launched by government takes time, so be patience and wait for namo Shetkari Yojana first installment. I hope soon till 15 August namo Shetkari Yojana first Installment transfer to formers account

      Reply

Leave a Comment