Solar Pump Yojana | कुसुम सोलारपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप वितरण केलं जात. कुसुम सोलर योजना राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविली जात असून सन 2022 मध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले; परंतु कोटा शिल्लक नसल्यामुळे वेबसाईटवरील नवीन अर्जाची प्रक्रिया बंद करण्यात आली होती.
कुसुम सोलर पंप योजना उपलब्ध कोटा
Kusum Solar Pump चा चालू वर्ष म्हणजेच 2023 साठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोठा उपलब्ध झालेला असून अर्जदारांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर यासाठी अर्ज करता येणार आहे.
♦️ हे पण वाचा : पशुधन किसान क्रेडिट कार्ड; आता पशुपालनासाठी कर्ज मिळणार
अर्जदारांना त्यासाठी सर्वप्रथम जिल्हा निवडून जात प्रवर्गनिहाय शिल्लक कोठा पाहावा लागेल, शिल्लक कोट्यामध्येसुद्धा MOTOR HP च्या श्रेणीनुसार कोठा उपलब्ध आहे. जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये फक्त SC/ST प्रवर्गासाठीचा कोठा उपलब्ध आहे.
जर तुम्हाला कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज भरायचा असेल, तर शासनाच्या महाऊर्जा या अधिकृत वेबसाईट/पोर्टलवर जाऊन खालील कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता. फोटो उपलब्ध असल्यास तुम्हाला 100 रुपयाचा ऑनलाईन पेमेंट करावा लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यात येईल.
कुसुम सोलरपंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्र (Documents)
- आधारकार्ड
- बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
- विहीर किंवा बोअर असलेला शेतजमिनीचा सातबारा उतारा
- जमिनीचा 8अ उतारा
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- सामायिक विहीर नोंद असल्यास संमतीपत्र
कुसुम सोलरपंप योजनाचा अर्ज करताना वरील आवश्यक कागदपत्र तुम्ही स्वतः जवळ बाळगणे आवश्यक आहे; कारण कागदपत्राशिवाय फॉर्म भरणा करून त्यामध्ये त्रुटी आल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. सद्यस्थितीमध्ये सोलार पंपासाठी खालील लिंकमध्ये देण्यात आलेल्या 17 जिल्ह्यामध्ये नवीन कोठा उपलब्ध झालेला आहे.
👇👇👇👇
या 17 जिल्ह्यामधे सोलर पंपाचा कोटा शिल्लक; येथे क्लिक करुन पहा