Farmer Loan Scheme : भाजीपाला, फळपिकांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार; पहा कोणती आहे योजना ?

By Admin

Published on:

Farmer Loan Scheme : यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तोंडात आलेला घास निसर्गाच्या कोपाणी काढून घेण्यात आला. दुसरीकडे उभ्या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजना

यावर उपाय म्हणून राज्य शासनाची डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजना खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे. लवकरच खरीप हंगाम सुरु होईल, यासाठी जिल्हा बँकांमार्फत कर्ज वाटपाची निश्चिती ठरविण्यात आली आहे. भाजीपाला, फळपिकासाठी या योजनेअंतर्गत 50 हजारापासून 3 लाखापर्यंत कर्ज वाटप केलं जातं.

डॉ.पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अल्पमुदतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. विहित मुदतीत म्हणजेच 365 दिवसांच्या आत किंवा 30 जूनपूर्वी कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलतीचा लाभ दिला जातो. 3% व्याज सवलत देण्याची योजना सन 2021-22 पासून राज्यात सुरू करण्यात आली.

💰 कर्जवाटपाची मर्यादा वाढली

राष्ट्रीयकृत बँकेसोबतच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पिक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवली आहे. 1 एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर्थिक वर्ष चालू झालेले असून, या चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज वाटप करण्यात येईल.

पीक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून शून्य टक्के व्याजदराने 3 लाखापर्यंत पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्याचप्रमाणे 1 ते 3 लाखाच्या कर्जमर्यादित विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना 1-3% व्याजदरात सवलत दिली जाते.

🍒फळ व फुल पिकांसाठी कर्ज किती ?

शेतकऱ्यांकडून पेरू, आंबे, डाळिंब इत्यादी फळ पिकासाठी कर्जाची मागणी केली जाते. बँकाकडून 1 एकरपासून ते 1 हेक्टरपर्यंत 50 हजारापासून ते 1 लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. फुल पिकांमध्ये जेलबिरा, पॉलिहाऊससाठी बागायतदार शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची मागणी केली जाते. मागणीनुसार बागायतदारांना 50 हजारापासून 3 लाखापर्यंत कर्ज वाटप केल जात.

📑 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment