किसान क्रेडिट कार्डवर मिळवा गाय, म्हैस, कुक्कटपालनासाठी (Loan) कर्ज : Pashu Kisan Credit Card

By Admin

Published on:

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पशुधनाला खूप महत्त्व आहे. हल्ली आठवडी बाजारामध्ये जनावरांची संख्या लाखाच्या जवळजवळ पोहचली आहे; परिणामी सामान्य शेतकऱ्याला जनावर खरेदी करणे आणि त्यांचे पालन करणे जवळपास अशक्यच झाला आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड

अशा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. जर तुमच्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा एखादा किसान क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डवर गाई, म्हैस खरेदी किंवा कुक्कुटपालनासाठी कर्ज घेऊ शकता. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.

🔴 हे पण वाचा : BBF पेरणी यंत्रासाठी 50% अनुदान; असा करा अर्ज

शासनाकडून शेती व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी किसान क्रेडिट कार्डची सुरुवात करण्यात आली. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पमुदतीतील कर्जासोबतच गाय, म्हैस, कुक्कुटपालन किंवा मत्स्य पालनासाठी कर्ज दिलं जातं.

ही योजना किसान क्रेडिट कार्ड सारखी असून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी मंजूर झालेले रक्कम 1 वर्षांमध्ये 6 हप्त्यात दिली जाते. पशुपालन करणारा शेतकरी, पशुधन मालक किंवा मत्स्यपालक यासारख्या आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींना पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येतो.

पशु किसान क्रेडिट कार्डचा फायदा ?

पशु किसान क्रेडिट कार्डचा माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना खूपच कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जातात. उपलब्ध झालेल्या कर्जाच्या आधारे शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करता येतात किंवा दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन अशा व्यवसायासाठीसुद्धा कर्ज पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिलं जात.

पशुसंवर्धनासाठी इतकं मिळणार कर्ज ?

पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं; म्हणजेच 3 लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेतकरी पात्र असतात. ज्यामध्ये म्हशीसाठी रु. 60,249/- गायीसाठी रु. 40,783/- अंडी देणाऱ्या प्रति कोंबड्यासाठी रु. 720/- आणि प्रति शेळी मेंढीसाठी रु. 4,063/- इतकं कर्ज पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येत.

1 लाख 60 हजार रुपयापर्यंतच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हमी आवश्यक नाही; पशुसंवर्धनासाठी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुपालकांना फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.

किसान क्रेडिट कार्डवर 1 लाखापर्यंत पीककर्ज (Crop Loan)

शेती करताना शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व औषध खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हा खर्च अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडण्याजोग नसतो; परिणामी शेतकरी सावकारी कर्ज काढतात. पण आता शेतकरी याला पर्याय म्हणून किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत अल्पमुदतीसाठी पीक कर्ज दिलं जात.

किसान क्रेडिट कार्ड कसं काढावं ?

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रसह अर्ज सादर करावा लागतो. पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सीएससी केंद्राच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड काढता येईल.

CSC मधून ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
CBI किसान क्रेडिट कार्डयेथे क्लिक करा
BOI किसान क्रेडिट कार्डयेथे क्लिक करा
MKCC किसान क्रेडिट कार्डयेथे क्लिक करा
विविध योजनांसाठीयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment