Government Subsidy : कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असला तरी विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना कांद्याला मिळावा तसा बाजारभाव मिळत नाही. यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली.
कांदा अनुदान योजना शेवटची मुदत, अर्जप्रक्रिया, फॉर्म
त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला मागणी नसल्यामुळे व चांगला बाजारभाव (Market Price) न मिळाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये खूपच घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूपच चिंतित होते.
🔴 हे पण वाचा : 177 कोटी नुकसान भरपाईचा शासन निर्णय आला ! यांनाच मिळणार मदत
शेतकऱ्यांना दिलासा व आर्थिक सहाय्य (Financial) करण्यासाठी राज्य शासनाने कांदा पिकाला प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. या संदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला.
शेतकऱ्यांना कांदा अनुदान (Subsidy) मिळवण्यासाठी 20 एप्रिल 2023 ही शेवटची मुदत देण्यात आलेली असून उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर संबंधित विभागाकडे अर्जाचा नमुना व आवश्यक ती कागदपत्रे दाखल करायची आहेत, त्यानंतरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देण्यात येईल.
कांदा अनुदानाचा PDF अर्ज (फॉर्म) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्जासाठी शेवटची तारीख ?
कांदा अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खरीप हंगामातील कांदा विक्री शासकीय किंवा खाजगी बाजार समितीमध्ये केलेली असेल, अश्या शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात किंवा वरील देण्यात आलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह द्यायचा आहे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र
- कांदा विक्री केल्याची पावती
- बँकेचा पासबुक झेरॉक्स
- पिक पाहणी नोंद
- पीक पाहणी नोंद नसेल, तर पंचनामा
- लिखित स्वरूपातील अर्ज किंवा विहित अर्जाचा नमुना
- जमिनीचा 7/12 उतारा