मित्रांनो, तुम्ही जर खेड्यापाड्यातील असाल, तर तुम्हाला नक्कीच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबद्दल माहिती असेल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना राहण्यासाठी घराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, सोबतच त्यांना शासनाकडून घरकुल मंजूर केलं जातं. तुम्ही प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेला असेल, तर नवीन ग्रामपंचायत Gharkul Yadi आलेली आहे. नवीन मंजूर ग्रामपंचायत घरकुल यादी आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे बघायची, याबद्दलची थोडक्यात माहिती याठिकाणी आपण पाहणार आहोत.
ग्रामपंचायत घरकुल यादी 2024
केंद्रशासनाकडून नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून द्यावा, या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात आली. या योजनेला प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) ग्रामीण किंवा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आवास योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली.
मोदी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब लाभार्थी कुटुंबांना स्वतःच घर बांधण्यासाठी शासनाकडून घरकुल स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. सदरच्या घरकुल योजनेअंतर्गत यापूर्वी घर बांधण्यासाठी शासनाकडून फक्त 70,000 रु. इतकं घरकुल देण्यात यायचं; परंतु यामध्ये वाढ करून आता लाभार्थ्यांना 1.20 लाख रु. घरकुल देण्यात येतं.
नवीन घरकुल मंजूर यादी
बहुतांश गावातील काही लाभार्थ्यांची घरकुल काम चालू आहेत, तर काही लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाला आहे. आपण पाहत असलेल्या या नवीन मंजूर घरकुल यादीत अशाच लाभार्थ्यांची नाव दिसतील, ज्यांना घरकुल मंजूर झालं आहे. घरकुलासाठी अर्ज करताना यादीत बऱ्याच लाभार्थ्यांचे नाव येतं; परंतु ऑनलाईन यादी पाहत असताना मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची लिस्ट दाखवली जाते.
घरकुल यादी (List) कशी बघावी ?
ग्रामपंचायत नवीन मंजूर घरकुल यादी मोबाईलमध्ये कश्याप्रकारे पहावी किंवा डाऊनलोड करावी, यासंदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. खाली देण्यात आलेल्या स्टेप बाय स्टेप माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या गावची प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेची घरकुल यादी मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.
- ग्रामपंचायत नवीन घरकुल यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्या – येथे क्लिक करा
- आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट उघडेल, ज्याठिकाणाहून तुम्ही घरकुल यादी पाहू शकता.
- वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्यासमोर A,B,C,D,E,F,G,H अश्या प्रकारची विविध बॉक्स दिसतील. घरकुल यादी पाहण्यासाठी या बॉक्समधील F ब्लॉकमध्ये Beneficiares Registered, Account Frozen & Verified या पर्यायावर क्लिक करा.
- आता Selection Filter मध्ये वरील दोन पर्याय जशास तसं ठेवून, तुमचं राज्य निवडून घ्या.
- त्यानंतर अनुक्रमे तुमचा तालुका, तालुका ब्लॉक, गावाचं नाव इत्यादी निवडा आणि Captcha Code टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा.
- काहीच वेळात तुमच्यासमोर तुमच्या गावची घरकुल यादी तुम्ही पाहू शकता, त्याचप्रमाणे घरकुल यादी पीडीएफमध्ये डाउनलोड करण्याची सुविधासुध्दा त्याठिकाणी देण्यात आलेली आहे.
घरकुलासाठी विविध योजना ?
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
- शबरी आवास योजना
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
- मुख्यमंत्री आवास योजना
- रमाई आवास योजना
- पारधी आवास योजना
नवीन ग्रामपंचायत घरकुल यादी 2023 कशी बघायची ?
प्रधानमंत्री आवास घरकुल योजना यादी कशी पहावी यासंदर्भातील सविस्तर माहिती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
घरकुल यादीत नाव कसं टाकाव ?
सर्वप्रथम घरकुल यादीत नाव टाकण्यासाठी लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असावा. लाभार्थी पात्र असल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पोर्टलच्या माध्यमातून यादीत नाव टाकू शकतात.
घरकुलासाठी कोण पात्र असेल ?
अर्जदार कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ अर्जदारांनी घेतलेला नसावा. सोबतच इतर व अटी शर्तीवर पात्र असावा.